Hon. Dr. V. S. Pawar Lecture Series
डॉ वसंतराव पवार व्याख्यानमालेस सुरुवात
श्रेयस , ईश्वर , गुरु , वाचन , सुभाषिते , संवाद , तंत्रज्ञान , आत्मसंवाद या ८ मात्रांचा जीवनात अवलंब केल्यास जीवन आनंदी होते . हे आनंदी जीवनच यशस्वी होते , यासाठी या ८ मात्रा जीवन जगण्यासाठी आवश्यक असल्याचे प्रतिपादन आयडीया चे माजी उपाध्यक्ष व साहित्यिक संजय जोशी यांनी केले ते के टी एच एम महाविद्यालयाच्या वतीने आयोजित डॉ वसंतराव पवार व्याख्यानमालेचे पहिले पुष्प ‘ जिवन यांना कळले हो ‘ या विषयावर गुंफतांना रावसाहेब थोरात सभागृहात बोलत होते यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष प्रतापदादा सोनवणे , सरचिटणीस श्रीमती नीलिमाताई पवार , चिटणीस डॉ सुनील ढिकले , उपसभापती नानाजी दळवी , संचालक नाना महाले , मुरलीधर अण्णा पाटील , भाऊसाहेब खताळे , डॉ अशोक पिंगळे , एकनाथ पगार , प्राचार्य डॉ आर डी दरेकर , शिक्षणाधिकारी प्रा एस के शिंदे , डॉ एन एस पाटील , सी डी शिंदे , प्रा रामनाथ चौधरी , प्रा प्राची पिसोळकर उपस्थित होते . मनाचा श्रावण करणारे श्रेयस ( मनाला आनंद देणाऱ्या ) असुन त्याचा शोध वयाचे २० वर्षापर्यंत घेतल्यास तुम्हाला ४० वर्षांपर्यंत भरपुर प्रेयस म्हणजेच भौतिक सुखें मिळविता येतात , त्याकरता श्रेयसाचा शोध घ्या , दुसरी मात्रा ईश्वर तुम्हाला श्रेयसापर्यंत घेऊन जाण्यास साहाय्यभूत ठरेल , तिसरी मात्रा गुरु असुन त्याने दाखविलेल्या योग्य मार्गाने गेल्यास जीवनाची सफलता मिळते. एका आयुष्यात असंख्य आयुष्य जगण्याचे साधन म्हणजे चौथी मात्रा वाचन होय.स्वतःच्या अनुभवातुन ,आयुष्यातुन आलेली पाचवी मात्रा म्हणजेच सुभाषिते होत.संवाद करण्याची सवय असली पाहीजे , अव्यक्ततेतुन गैरसमज होतात , यासाठी कृतज्ञता व्यक्त करणारी सहावी मात्रा म्हणजे संवाद होय. तुमच्या पुढच्या पिढीकडून तंत्रज्ञान शिकुन घ्या कारण ही सातवी मात्रा विचार करण्याची पध्दत शिकविते. प्रत्येक वयाच्या वळणावर स्वतःशी बोला , कारण आठवी मात्रा आत्मसंवाद ही तुमच्या श्रेयसाचा शोध घेण्यास अत्यंत उपयुक्त ठरते असे जोशी यांनी अखेरीस सांगितले.
अध्यक्षीय मनोगतात संस्थेच्या सर्व संस्थापकांना जिवन कळले होते , त्यामुळेच त्यांनी मविप्र शिक्षण संस्थेची बहुजनांसाठी पायाभरणी केली, तसेच यावेळी जोशी यांच्या व्याख्यानाने रावसाहेब थोरात सभागृहाचा उंबरा श्रीमंत तर झालाच पण आनंदीही झाल्याचे सरचिटणीस श्रीमती निलीमाताई पवार यांनी सांगितले.प्रमुख पाहुण्यांचे स्वागत, परीचय व प्रास्ताविक प्राचार्य डॉ आर डी दरेकर यांनी केले , सुत्रसंचलन डॉ डी पी पवार यांनी तर आभार प्रा योगेशकुमार होले यांनी मानले.