बहुजन हिताय बहुजन सुखाय

मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक.

Maratha Vidya Prasarak Samaj, Nashik.

Central Office, Shivaji Nagar, Gangapur Road, Nashik-422002, Maharashtra, India.

World Olympic Day

World Olympic Day

मविप्रतर्फे वर्ल्ड ऑलिम्पिक डे रन उत्साहात

जागतिक ऑलिम्पिक दिनाचे औचित्य साधून मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेतर्फे १ कि मी अंतराचा ऑलिम्पिक डे रन घेण्यात आला , यावेळी नाशिक च्या महापौर सौ रंजना भानसी ,पोलिस आयुक्त डॉ रविंद्र सिंघल , मविप्र संस्थेच्या सरचिटणीस श्रीमती निलीमाताई पवार ,आ जयंत जाधव , मा महापौर अशोक मुर्तडक , अजय बोरस्ते , जिल्हा क्रीडाधिकारी रविंद्र नाईक ,महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सदस्य अशोक दुधारे , साहेबराव पाटील , चिटणीस डॉ सुनिल ढिकले , सेवक संचालक डॉ अशोक पिंगळे , शिक्षणाधिकारी डॉ डी डी काजळे , प्रा एस के शिंदे , प्रा रामनाथ चौधरी , सी डी शिंदे , डॉ एन एस पाटील , प्राचार्य डॉ व्ही बी गायकवाड , प्राचार्य दिलीप डेर्ले ,डॉ कैलास होळकर , डॉ पी व्ही रसाळ , डॉ दिलीप शिंदे ,डॉ एम बी नरवडे , प्राचार्या डॉ प्राजक्ता बस्ते , प्राचार्या डॉ यु बी पुरकर ,मुख्याध्यापक अरुण पिंगळे , श्रीमती मीनाक्षी गायधनी , एस टी आथरे , के एस गावले , क्रीडा संचालक , प्राध्यापक , शिक्षक , विद्यार्थी यांच्या उपस्थितीत करण्यात आले . कार्यक्रमाच्या सुरुवातीला महापौर सौ रंजनाताई भानसी व अर्जुन पुरस्कार प्राप्त ऑलिम्पिक खेळाडू कविता राऊत , डॉ रविंद्र सिंघल यांच्या हस्ते ऑलिम्पिक स्पर्धांचे जनक बॅरन पिअर द कुबर्टिन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच ऑलिम्पिक ध्वजाचे संस्थेने मराठीत तयार करण्यात आलेल्या ऑलिम्पिक गीताची धून वाजवुन ध्वजारोहण करण्यात आले .

वर्ल्ड ऑलिम्पिक डे रनला संस्थेचे सर्वोत्कृष्ठ खेळाडू सागर गाढवे , निकीता संभेराव ,पायल पळसकर , हर्षल शार्दुल , गौरव लांबे ,प्राजक्ता बोडके , स्नेहल विधाते , शरयू पाटील , अंजली मुर्तडक यांच्या हस्ते flag off करून सुरुवात करण्यात आली , यावेळी मविप्र marathon चौक ते व्ही एन नाईक चौक व पुन्हा मविप्र marathon चौक असा १ कि मी अंतराचा रन करण्यात आला , यामध्ये नाशिक जिल्हा स्केटिंग , रोईंग , Atheletics , कॅनोइंग , handball , आर्चरी ,योग असोसिएशन , सॉफ्टबॉल तसेच संस्थेच्या विविध शाखांमधील विद्यार्थी , शिक्षक , खेळाडूंनी सहभाग नोंदविला .यानिमित्त ऑलिम्पिक विषयी घोषवाक्य स्पर्धा घेण्यात आली , या घोषवाक्य स्पर्धेत प्रथम क्रमांक ओम लवांड होरायझन अकॅडेमी , द्वितीय रुचिता आहिरराव होरायझन अकॅडेमी , तृतीय क्रमांक हर्ष गुंजाळ जनता विद्यालय सातपुर यांनी मिळविला .सलग चौथ्या वर्षी ऑलिम्पिक डे रन यशस्वी करण्यासाठी मविप्र क्रीडाधिकारी प्रा हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली डॉ राजाराम कारे , दिलीप गायकवाड , आर एन पवार , अनिल उगले , सुहास खर्डे ,राजेंद्र पोटे , विक्रांत राजोळे , गणेश कोंडे , नारायण वडजे ,सोमेश्वर मुळाणे , रमेश तुंगार , प्रा अे जे बोडके आदींनी प्रयत्न केले . नाशिक जिल्ह्यातून असे अनेक चांगले खेळाडू तयार व्हावेत यासाठी मराठा विद्या प्रसारक संस्था ‘ मविप्र Marathon , वर्ल्ड ऑलिम्पिक डे , राष्ट्रीय क्रीडा दिन ‘ यासारखे अनेक दर्जेदार उपक्रम राबवीत आहे . सदर कार्यक्रमासाठी पोलिस यंत्रणा व वाहतूक शाखेचे विशेष सहकार्य लाभले


OUR RECRUITERS

CONTACT US

  •  Office : Shivaji Nagar,
  • Gangapur Road, Nashik,
  • Nashik-422002,
  • Maharashtra, India.
  • +91-253-2574511,
  • 2573422 , 2573306
  •  Fax : +91-253-2579863
  •  ndmvpsamajnashik@yahoo.co.in

LOCATION