Yoga Day
मविप्रमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात ……
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक , जिल्हा युवक कल्याण व क्रीडा विभाग , शिक्षण उपसंचालक कार्यालय , जिल्हा परीषद नाशिक व पतंजली योग धाम केंद्र नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने के टी एच एम महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर सामुदायिक योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी सुमारे ०६ हजार विद्यार्थी , शिक्षक व पालकांनी सार्वजनिक योग कार्यक्रमात सहभाग घेतला. प्रारंभी मविप्रच्या सरचिटणीस श्रीमती नीलिमाताई पवार , शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव , सहायक शिक्षण संचालक दिलीप गोविंद , जि प शिक्षणाधिकारी नितीन उपासनी , क्रीडा उपसंचालक डॉ जयप्रकाश दुबळे ,शिक्षणाधिकारी प्रविण अहिरे , जिल्हा क्रीडाधिकारी रविंद्र नाईक ,पतंजली योग धामचे योगगुरू गोकुळ घुगे यांच्या प्रमुख उपस्थितीत दिपप्रज्वलन करून योगदिनाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. योगगुरू गोकुळ घुगे यांनी या कार्यक्रमाचे संचलन केले. यावेळी त्यांनी योगाचे महत्व विशद केले तसेच योग आणि योगासनांची प्रात्यक्षिके करून दाखवली व उपस्थितांकडून ती करवून घेतली. समाजातील सर्व घटकांनी नियमितपणे योगाभ्यास केला तर बहुतेक सर्व व्याधी दूर होतील आणि प्रत्येक व्यक्तीला निरोगी आणि निरामय जीवनाची अनुभूती घेता येईल असे मत योगगुरू गोकुळ घुगे यांनी व्यक्त केले.
यावेळी के टी एच एम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ व्ही बी गायकवाड , संस्थेचे शिक्षणाधिकारी डॉ डी डी काजळे , डॉ आर डी दरेकर , प्रा एस के शिंदे , प्राचार्य डॉ चंद्रकांत बोरसे , डॉ दिलीप डेर्ले , एन सी सी , एन एस एस चे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.