Yuva spandan
मविप्र युवास्पंदन २०१६ – १७ ला रावसाहेब थोरात सभागृहात सुरुवात …
मविप्र संस्थेतर्गत असलेल्या विविध महाविद्यालयासाठी मविप्र युवास्पंदन २०१६ -१७ हा उपक्रम संस्थेने ४ वर्ष सातत्याने राबविला आहे , या उपक्रमाच्या माध्यमातून संस्थेच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना विकसित करण्यासठी युवास्पंदन चे आयोजन करण्यात येत असल्याचे प्रतिपादन संस्थेच्या सरचिटणीस श्रीमती निलीमाताई पवार यांनी केले त्या मविप्र युवास्पंदन २०१६-१७ या कार्यक्रमात रावसाहेब थोरात सभागृहात बोलत होत्या , यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी संचालक नाना महाले , संचालक भाऊसाहेब खातळे ,स्थानिक व्यवस्थापन समिती चे गणपतराव शिंदे , अॅड एकनाथ पगार , शिक्षणाधिकारी डॉ डी डी काजळे , प्रा एस के शिंदे , प्राचार्य डॉ आर डी दरेकर , सांस्कृतिक कार्यक्रम अधिकारी प्रा आर के मुंगसे , प्राचार्य डॉ पी व्ही रसाळ , डॉ डी व्ही डेर्ले , प्रा रमेश वडजे , डॉ बोरसे , डॉ वेदश्री थिगळे , प्रा पंकजसिंह चौहान , डॉ उषा पुरकर उपस्थित होते .मविप्र संस्थेच्या कर्मवीरांनी संस्थेच्या स्थापनेवेळी जलसे व कलापथकाच्या माध्यमातून प्रबोधन करून विद्यार्थी एकत्रित केले . त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन संस्थेने विद्यार्थ्यांमधील विविध सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी संस्था पातळीवर युवास्पंदन या कार्यक्रमाची सुरुवात केली असे निलीमाताई पवार यांनी सांगितले .विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच सांस्कृतिक कलागुण विकसित करण्यासाठी तसेच त्यांच्यातील शिस्त , गुणवत्ता वाढावी यासाठी युवास्पंदन चे व्यासपीठ संस्थेने उपलब्ध करून दिले , भविष्यात या स्पर्धेतून चांगले कलाकार ,अभिनेते निर्माण होतील असा विश्वास संस्थेचे संचालक नाना महाले यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केला .
चार दिवस चालणाऱ्या युवास्पंदन या सांस्कृतिक कार्यक्रम नियोजनाकरिता महाविद्यालयाने विविध समित्यांची नियुक्ती केली . युवास्पंदन स्पर्धेची पारदर्शकता ही खरी ओळख असुन यामधुन गुणवत्तेला प्राधान्य दिले जाते असे सांगून सर्व सहभागी संघांना प्राचार्य डॉ आर डी दरेकर यांनी आपल्या प्रास्ताविकातून शुभेच्छा दिल्या .आजच्या सत्रात समूहगीत 12 संघ , वेस्टर्न होकल सोलो ५ संघ , वेस्टर्न ग्रुप सॉंग ४ संघ , फोक ऑर्केस्ट्रा ७ संघ यांनी सादरीकरण केले . स्पर्धकांनी समूह्गीतात देशभक्तीपर गीत तसेच चंपाषष्टी चे औचित्य साधुन खंडोबाची विविध धार्मिक गीते सादर केली , यावेळी परीक्षक म्हणुन आशिष रानडे व आनंद अत्रे यांनी काम बघितले .कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ डी पी पवार , प्रा तुषार पाटील यांनी तर आभार प्रा आर के मुंगसे यांनी मानले .