‘उलगुलान’ नाटकासाठी मनोज शेंद्रे या विद्यार्थ्याला अभिनय गुणवत्ता प्रमाणपत्र
Category : Latest News , social_projects , Uncategorised
६१ व्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत मराठा विद्या प्रसारक समाज संचलित के.टी.एच.एम. महाविद्यालय बी व्होक नाट्यशास्र (Dramatics) मार्फत सादर केलेल्या ‘उलगुलान ‘ या नाटकासाठी मनोज शेंद्रे या विद्यार्थ्याला अभिनय गुणवत्ता प्रमाणपत्र मिळाले. या यशाबद्दल मनोज चे मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे,अध्यक्ष डॉ.सुनिल ढिकले, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वास मोरे, चिटणीस दिलीप दळवी, उपसभापती देवराम मोगल, नाशिक शहर संचालक ॲड लक्ष्मणराव लांडगे,नाशिक ग्रामीण संचालक रमेश आबा पिंगळे, शिक्षणाधिकारी डॉ एन के जाधव,प्राचार्य डॉ आर डी दरेकर,विभागप्रमुख प्रा तेजस बिल्दीकर,प्रा सुरज बोडाई यांनी अभिनंदन केले आहे.