बहुजन हिताय बहुजन सुखाय

मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक.

Maratha Vidya Prasarak Samaj, Nashik.

Central Office, Shivaji Nagar, Gangapur Road, Nashik-422002, Maharashtra, India.

केटीएचएम महाविद्यालयात भौतिकशास्त्र विभागाच्या वतीने चंद्रयान थ्री पोस्टर मॉडेल तसेच रांगोळी स्पर्धेचे आयोजन

  • -
3

केटीएचएम महाविद्यालयात भौतिकशास्त्र विभागाच्या वतीने चंद्रयान थ्री पोस्टर मॉडेल तसेच रांगोळी स्पर्धेचे आयोजन

मराठा विद्या प्रसारक समाजाच्या केटीएचएम महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागाच्या वतीने दिनांक २३ ऑगस्ट २०२३ रोजी इसरोच्या चंद्रयान थ्री च्या सॉफ्ट लँडिंग निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी पोस्टर मॉडेल तसेच रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर डी दरेकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. एस एन अहिरे, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. पी व्ही कोटमे, उपप्राचार्य डॉ. कल्पना अहिरे, उपप्राचार्य डॉ. एस एस पाटील, उपप्राचार्य सोनवणे सर, उपप्राचार्य डॉ. व्ही बी बोरस्ते बोरस्ते, आय क्यू ए सी कॉर्डिनेटर डॉ. एन डी गायकवाड, विविध विभागांचे विभाग प्रमुख, तसेच भौतिकशास्त्र विभागातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. याप्रसंगी ११० विद्यार्थ्यांनी पोस्टर रांगोळी तसेच मॉडेल स्पर्धेत सहभाग नोंदवला. पोस्टर व मॉडेल स्पर्धेचे परीक्षण भौतिकशास्त्र विभागातील प्राध्यापक विभाग प्रमुख डॉ. एस एन अहिरे, डॉ. एस आर गडाख, तसेच डॉ. एन के पवार यांनी केले.
याप्रसंगी बोलताना माननीय प्राचार्य डॉ.आर डी दरेकर यांनी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत व्हावा, तसेच त्यांच्यामधील स्किल डेव्हलप व्हावे याकरिता महाविद्यालयातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. आजच्या कार्यक्रमाप्रसंगी डॉ दरेकर यांनी विद्यार्थ्यांना चंद्रयान तीन या इस्रो मिशन विषयी माहिती सांगताना इस्रोच्या चंद्रयान एक चंद्रयान दोन व चंद्रयान तीन या तीनही मिशन मध्ये भारताने जे कौशल्य मिळवले आहे त्याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांना सुद्धा कशी आपली कौशल्य वाढवता येतील त्याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. एस एन अहिरे यांनी केले याप्रसंगी बोलताना डॉ. एस एन अहिरे यांनी सर्व उपस्थितांना चंद्रयान मोहिमेच्या उद्दिष्टांविषयी जागृत केले तसेच आजचा कार्यक्रम हा विद्यार्थ्यांमध्ये याविषयी असलेले कुतूहल जागृत करण्यासाठी घेण्यात आला आहे असे प्रास्ताविक केले.उद्घाटन समारंभाचे आभार प्रदर्शन प्राध्यापक डॉ. एन के पवार यांनी केले. त्यानंतर परीक्षकांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पोस्टर मॉडेल तसेच रांगोळ्यांचे परीक्षण केले. रांगोळी स्पर्धेचे परीक्षण इंटेरियर डिझाईन विभागातील प्राध्यापिका पालेकर मॅडम आणि सहकाऱ्यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. तसेच महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थी व प्राध्यापकांसाठी व्हीएलसी हॉल येथे चंद्रयान तीन च्या सॉफ्ट लँडिंग चे लाईव्ह स्ट्रीमिंग दाखवण्यात आले. याप्रसंगी भौतिकशास्त्र विभागातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

OUR RECRUITERS

CONTACT US

  •  Office : Shivaji Nagar,
  • Gangapur Road, Nashik,
  • Nashik-422002,
  • Maharashtra, India.
  • +91-253-2574511,
  • 2573422 , 2573306
  •  Fax : +91-253-2579863
  •  ndmvpsamajnashik@yahoo.co.in

LOCATION