के टी एच एम महाविद्यालयाचे धोडप किल्ला येथे गिर्यारोहण शिबीर उत्साहात…
Category : social_projects
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व मविप्र संचलित के टी एच एम महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास मंडळ आयोजित जिल्हास्तरीय गिर्यारोहण शिबीर ३० जानेवारी रोजी चांदवड मधील धोडप किल्ला येथे आयोजित केले होते. शिबिराचे उद्घाटन प्राचार्य डॉ.व्ही.बी.गायकवाड यांनी केले. यावेळी विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. गणेश मोगल, प्रा.वाय.के.चौधरी, प्रा.कां
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या धोडप किल्ल्यावर विद्यार्थ्यांनी मुख्य परिसराची स्वच्छता करून गडावरील मार्गातील पडलेला कचरा व प्लास्टिक जमा केला. विद्यर्थ्यांना यावेळी डॉ. एन. डी. गायकवाड यांनी किल्ल्याविषयी सविस्तर माहिती सांगितली. विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. गणेश मोगल यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाविषयी मार्गदर्शन केले तसेच गड व किल्ले संवर्धन करणे हि काळाची गरज असल्याचे सांगितले.
गड परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर गडाच्या पायथ्याशी असलेल्या हट्टी या गावातील अडव्हेन्चर क्लबमध्ये विद्यार्थ्यांनी व्यवस्थापक मनोज परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली साहस शिबिरांतर्गत विविध उपक्रम केले. या कार्यशाळेसाठी विकास कुलकर्णी, माधुरी वाघ, श्वेता राऊत, श्याम पवार यांनी परिश्रम घेतले.