बहुजन हिताय बहुजन सुखाय

मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक.

Maratha Vidya Prasarak Samaj, Nashik.

Central Office, Shivaji Nagar, Gangapur Road, Nashik-422002, Maharashtra, India.

चौथी औद्योगिक क्रांती ही जैव तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान व नॅनो टेक्नोलॅाजीवर आधारित असेल – डॉ.विनायक गोविलकर

  • -

चौथी औद्योगिक क्रांती ही जैव तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान व नॅनो टेक्नोलॅाजीवर आधारित असेल – डॉ.विनायक गोविलकर

Category : social_projects

के.टी.एच.एम. महाविद्यालयाच्या वाणिज्य प्रयोगशाळा व संशोधन केंद्रातर्फे आयोजित विचारमंथन व्याख्यानमालेत चौथी औद्योगिक क्रांती या विषयावर दुसरे पुष्प डॉ.गोविलकरांनी गुंफले,यावेळी बोलतांना त्यांनी ‘ पहिली औद्योगिक क्रांती १८ व्या शतकात (१७८४ ते १९ वे शतक) सुरु झाली, त्यावेळेस पाण्याचा व वाफेचा उर्जा म्हणून वापर करण्यास सुरवात झाली, त्या काळात वस्त्र उद्योगास चालना मिळाली, दुसरी औद्योगीक क्रांती (१८७० ते १९१४) या काळात झाली. त्यावेळेस कोळश्याचा विजेसाठी वापर केला जाऊ लागला व त्या औद्योगिक क्रांतीत वाफ व वीज यांचा उर्जा म्हणून वापर करण्यास सुरवात झाली. तसेच त्या काळात लोखंड, ओईल व विजेच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. तिसरी औद्योगिक क्रांती १९८० नंतर सुरु झाली त्यात डिजिटल तेक्नोलोजीचा उदय झाला व इलेक्ट्रोनिक्सवर आधारित उद्योगांना चालना मिळाली. चौथी औद्योगिक क्रांती २०१६ पासून सुरु झाली असून ही औद्योगिक क्रांती जैव तंत्रज्ञान, नानो टेक्नोलोजी व कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर आधारित औद्योगिक क्रांती सुरु झाली. त्यामुळे आता माणूस मशीनला बुद्धिमत्ता वापरण्याइतपत सक्षम बनवू लागला. आता मशीन माणसाला मार्गदर्शन करते, मशीनला स्वताची बुद्धिमत्ता असल्याने माहिती मिळविणे, माहितीचे पृथकरण करणे आणि त्याच्या आधारावर निर्णय घेणे इत्यादी कामे करू लागल्याने माणसांची कामे यापुढे यंत्र करू लागतील. स्वयंचलित यंत्र, स्वयंचलित वाहने व यंत्रमानव यापुढे सर्व क्षेत्रात उदा. बँका,उद्योगधंदा, शेती उद्योग, वाहन उद्योग, शिक्षण क्षेत्रात इ. क्षेत्रात काम करताना दिसतील त्याचा परिणाम उत्पादन क्षमता वाढेल, उत्पादनाचा दर्जा वाढेल, उत्पादन अचूक व दोष विरहित होत जाईल. ग्राहकांना चांगली सेवा मिळेल, विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होतील. परंतु अकुशल कामे उदा. कारकुनी कामे, हिशोबाची कामे,कायद्याचा सल्ला देण्याची कामे ई. कामे यंत्रामार्फत केले जातील त्यामुळे रोजगार ५०% पेक्षा जास्तीने कमी होतील त्यामुळे पुढच्या पिढीने विज्ञान व तंत्रज्ञानावर आधारित कौशल्य प्राप्त करणे गरजेचे आहे अन्यथा त्यांना रोजगार मिळणे अशक्य होईल.व्याख्यानमालेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य.डॉ.व्ही.बी.गायकवाड होते. प्रमुख वक्त्यांचा परिचय प्रा.डॉ.श्रीकांत जाधव यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा.डी.जी.पोटे यांनी तर आभार विभागप्रमुख प्रा.डी.आर.पताडे यांनी मानले.