बहुजन हिताय बहुजन सुखाय

मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक.

Maratha Vidya Prasarak Samaj, Nashik.

Central Office, Shivaji Nagar, Gangapur Road, Nashik-422002, Maharashtra, India.

जनता विद्यालय गांधीनगर चा सुवर्ण महोत्सव संपन्न…

  • -

जनता विद्यालय गांधीनगर चा सुवर्ण महोत्सव संपन्न…

Category : social_projects

मविप्र संचलित जनता विद्यालयाच्या सुवर्ण महोत्सव सांगता समारंभ संपन्न झाला,यावेळी प्रमुख वक्ते म्हणून जेष्ठ साहित्यिक उत्तमराव कांबळे उपस्थित होते.तसेच कार्यक्रमप्रसंगी संस्थेच्या सरचिटणीस श्रीमती निलीमाताई पवार,चिटणीस डॉ.सुनिल ढिकले,संचालक नाना महाले,भाऊसाहेब खताळे,प्रल्हाद गडाख,सचिन पिंगळे,माजी महापौर अशोक दिवे,नगरसेविक  राहुल  दिवे, आशा तडवी,सुषमा पगारे,सेवक संचालक प्रा.नानासाहेब दाते,गुलाबराव भामरे,सौ.नंदा सोनवणे,शिक्षणाधिकारी प्रा.एस.के.शिंदे,सी.डी.शिंदे, स्कूल कमिटी सदस्य नामदेव आढाव,योगेश कासार,रामदास लांडगे,गोपीचंद पवार,साहेबराव पवार,योगेश नन्नावरे,अनिल गांगुर्डे,वाल्मीकराव जाधव,शंकरराव खेलूकर,संजय खैरनार,सिद्धार्थ भालेराव,कृष्णकुमार पाटील उपस्थित होते. अध्यक्षस्थानी सभापती माणिकराव बोरस्ते होते.

उत्तमराव कांबळे यांनी आपल्या मनोगतात ‘ सध्याच्या घडीला जुन्या आणि नव्या शिक्षणपद्धतीची सांगड घालणे गरजेचे आहे.तसेच विद्यार्थ्यांमध्ये   सामाजिक जाणीव निर्माण करावी असे सांगत मविप्र संस्था हि अनेक उपक्रमांच्या माध्यमातून परिपूर्ण विद्यार्थी घडविण्यासाठी कायम कार्यरत असल्याचे सांगत संस्थेने आजपर्यंत अनेक सुजाण नागरिक व विद्यार्थी घडविल्याचे सांगितले.

सरचिटणीस श्रीमती निलीमाताई पवार यांनी ‘विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था कायम प्रयत्न करीत असून नवीन शैक्षणिक वर्षापासून दर शनिवार हा अक्टीव्हीटी दिवस म्हणून साजरा केला जाईल तसेच शनिवार हा विनादप्तराचा वार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय मनोगतात सभापती माणिकराव बोरस्ते यांनी संस्थेच्या उभारणीत कर्मवीरांनी मोठे योगदान दिलेले असून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस असून संस्था कायम विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्नवत राहील असे सांगितले.

माजी महापौर अशोक दिवे यांनी त्यांच्या जडण-घडणीत शाळेचा मोठा वाटा असून शाळेच्या ५० वर्षाच्या वाटचालीचा साक्षीदार असल्याचे सांगतांना सुवर्ण महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.प्रास्ताविकात मुख्याध्यापक एस.एम.बच्छाव यांनी शाळेच्या ५० वर्षाच्या वाटचालीचा आढावा घेतला.सुत्रसंचलन श्रीमती सुनिता कटाळे यांनी तर आभार श्रीमती माधवी गांगुर्डे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी पर्यवेक्षक बी.जे.बच्छाव,आर.एस.बच्छाव,एन.के.निकम,पी.जी.मुठाळ,आर.के.देवरे,एस.आर.नवले,एस.एल.जाधव व अभिनव बालविकास मंदिर चे कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला वृक्षारोपण करण्यात आले तसेच पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली.