जनता विद्यालय शिंदे भायाळे नवीन इमारतीच्या कामाचे भूमिपूजन संस्थेचे सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे यांच्या शुभहस्ते
Category : Latest News , social_projects , Uncategorised
जनता विद्यालय शिंदे भायाळे नवीन इमारतीच्या कामाचे भूमिपूजन संस्थेचे सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चांदवड तालुका संचालक डाॅ सयाजीराव गायकवाड होते. शाखेची स्थापना १९९३ साली झाली होती. परंतु शाळेसाठी सुसज्ज अशी इमारत नव्हती. ३० वर्षाच्या प्रदीर्घ कालखंडानंतर या विद्यालयाचे इमारत भूमिपूजन झाले, त्यामुळे सर्व गावकऱ्यांनी संस्थेचे आणि सर्व संचालक मंडळाचे आभार मानले. आपल्या मनोगतात ॲड.नितीन ठाकरे यांनी मविप्र ची सत्ता हातात येऊन एक वर्ष पूर्ण झाले असून संस्थेचा कारभार सर्वांना विश्वासात घेऊन सुरु आहे असे सांगून सर्वसमावेशक काम करणार असल्याचे सांगितले.
अध्यक्षीय मनोगतात डॉ.सयाजीराव गायकवाड यांनी ‘व्यक्ती हितापेक्षा संस्था मोठी आहे तसेच ही संस्था सर्व सभासदांच्या विचारांवर चालते आणि संस्थेचे खरे मालक हे संस्थेचे सभासदच असल्याचे सांगितले.याप्रसंगी सुदाम शंकर शिंदे यांनी ११ हजार रु.,आंबादास रामभाउ ठोंबरे यांनी ११ हजार रु,नामदेव बापु शिंदे यानी २१ हजार रुपये, अर्जुन साठे यांनी १० हजार रु. देणगी संस्थेला दिली.
याप्रसंगी संस्थेचे जेष्ठ सभासद देवराम भाऊ शिंदे ,सुभाष अंबादास शिंदे, अशोक सोनवणे ,सुभाष चंद्रभान शिंदे तसेच शालेय समितीचे सर्व सदस्य,सुदाम काका,नवनाथ ठोंबरे,रवि काळे ,बाबुराव शिंदे,निवृती शिंदे,दिलीपराव सादडे,नामदेव शिंदे,गोपीनाथ शिंदे,दत्तु शिंदे,भाऊसाहेब शिंदे गोपीनाथ शिंदे,विठ्ठल सोनवणे,अण्णा सादडे,नवनाथ शिर्के,कादवा कारखाण्याचे संचालक सुभाष शिंदे, संस्थेचे इंजिनियर जाधव , निकम साहेब ,कॉन्ट्रॅक्टर वाघ , शिंदे गावातील सरपंच ,उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ,कादवा सहकारी कारखान्याचे संचालक सुभाष शिंदे,विद्यालयाचे मा. मुख्याध्यापक ठोबरे सर ,विद्यालयाचे आजी-माजी विद्यार्थी उपस्थित होते
मुख्याध्यापिका बैरागी , यांनी स्वागत व प्रास्ताविक केले,नागरे सर, चव्हाण , शिंदे मामा, सोनवणे मामा, यांनी परिश्रम घेतले .