बहुजन हिताय बहुजन सुखाय

मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक.

Maratha Vidya Prasarak Samaj, Nashik.

Central Office, Shivaji Nagar, Gangapur Road, Nashik-422002, Maharashtra, India.

डॉ. पवार वैद्यकीय महाविद्यालयात मॉडेल व पोस्टर निर्मिती स्पर्धा

  • -

डॉ. पवार वैद्यकीय महाविद्यालयात मॉडेल व पोस्टर निर्मिती स्पर्धा

Category : social_projects

मॉडेल निर्मितीतून अवघड शिक्षण सुकर – डॉ. मृणाल पाटील 

वैद्यकीय शिक्षणात वर्गातील पुस्तकी अध्ययनात  सर्व पैलू उलगडत नाही , त्यामुळे पुस्तकांपलीकडे ज्ञानर्जन करतांना  जिवंत कृतीचे मॉडेल व पोस्टर तयार करून विद्यार्थ्यांना अवघड शिक्षण सोप्या पद्धतीने समजून घेता येईल , असे प्रतिपादन डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मृणाल पाटील यांनी व्यक्त केले.

आडगाव येथील मराठा विद्या प्रसारक समाजाच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण तंत्रज्ञान आणि  शरीरक्रिया शास्त्र  विभागाच्या वतीने आयोजित मॉडेल व पोस्टर निर्मिती स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी डॉ. मृणाल पाटील बोलत होत्या. कमी खर्चात, टाकाऊ पासून टिकावू आणि कमी उर्जेवर आधारित विकसित तंत्रज्ञानाचा वापर करत बनविलेले जिवंत प्रतिकृती आणि पोस्टर वैद्यकीय शिक्षणातील गोडी निश्चितच वाढवेल असा विश्वास व्यक्त करून वैद्यकीय शिक्षणात अश्या प्रकारचा प्रयोग प्रथमच मविप्रच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाच्या एमईटी सेल ने केला असल्याचे   शेवटी त्यांनी सांगितले.   प्रारंभी विभागप्रमुख डॉ. प्रदीप बर्डे यांनी प्रास्ताविक करून  मूत्राशयाचे काम , रक्तदाब नियंत्रणाचे काम , थॉयरॉईड ग्रंथीचे कार्यशैली या सारख्या  अवघड विषयांवर विद्यार्थ्यांनी  जीवंतप्रतिकृती व पोस्टर  सादर केले असून  अश्या स्पर्धेतून विद्यार्थ्यांमध्ये एकत्रित कामकाज , परस्पर सं वाद कौशल्य, सृजनशीलता  वाढीस वागून प्रशिक्षित डॉक्टर तयार होऊन उच्च दर्जाची आरोग्य सुविधा स्वस्त दरात  उपलब्ध होतील , असा विश्वास व्यक्त केला- याप्रसंगी डॉ. नीलिमा चाफेकर , जोत्स्ना कुलकर्णी,  डॉ. गौरी प्रधान ,  डॉ नीता गांगुर्डे, डॉ. गणेश घुगे आदी उपस्थित होते.   या स्पर्धेत डॉ. पवार वैद्यकीय महाविद्यालयासह  लातूर , अहमदनगर आदी ठिकाणच्या महाविद्यालयाचे विद्यार्थी  सहभागी झाले.  स्पर्धेतील विजेत्यांना अधिष्ठाता डॉ-  मृणाल पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले- स्पर्धा यशस्वीतेसाठी डॉ. वृषाली बस्ते , डॉ. सतीश वाघमारे, डॉ.  बी.व्ही. शिंदे  व फिजिओलॉजी विभाग कर्मचारी  प्रयत्नशील होते .

 आडगाव येथील मराठा विद्या प्रसारक समाजाच्या डॉ- वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण तंत्रज्ञान आणि शरीरक्रिया शास्त्र  विभागाच्या वतीने आयोजित मॉडेल व पोस्टर निर्मिती स्पर्धेत मॉडेल ची सहभागी विद्यार्थ्यांकडून  माहिती जाणून घेतांना अधिष्ठाता डॉ- मृणाल पाटील, डॉ – प्रदीप बर्डे , डॉ. गौरी प्रधान , डॉ . गणेश घुगे.