बहुजन हिताय बहुजन सुखाय

मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक.

Maratha Vidya Prasarak Samaj, Nashik.

Central Office, Shivaji Nagar, Gangapur Road, Nashik-422002, Maharashtra, India.

डॉ.वसंतराव पवार व्याख्यानमालेचा समारोप…

  • -

डॉ.वसंतराव पवार व्याख्यानमालेचा समारोप…

Category : social_projects

विज्ञानाचा सहाय्यक म्हणून वापर करा – विज्ञान लेखिका माधुरी शानभाग …

वैज्ञानिक शास्रातील विषयांमध्ये दिवसेंदिवस वैद्यानिक दृष्टीकोनातून संशोधन होत आहे.येणाऱ्या काही शतकांमध्ये याचे प्रमाण वाढणार आहे. हि होणारी वैज्ञानिक संशोधनाची क्रांती सर्व जगासाठी हितकारक ठरणार असे म्हंटले तरी देखील विज्ञानाला आपण सहाय्यक म्हणूनच वापरले पाहिजेअसे प्रतिपादन विज्ञान लेखिका माधुरी शानभाग यांनी केले त्या के टी एच एम महाविद्यालय पत्रकारिता व जनसंज्ञापन विभाग आयोजित दहाव्या डॉ वसंतराव पवार व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प गुंफतांना रावसाहेब थोरात सभागृहात बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संचालक डॉ.प्रशांत देवरे होते.यावेळी शिक्षणाधिकारी डॉ. डी. डी. काजळे, सी. डी. शिंदे, डॉ. आर. डी. दरेकर, उपप्राचार्य. डॉ. एम. बी. मत्सागर, डॉ. श्रीमती. बी. डी.पाटील, डॉ. बी. जे. भंडारे, प्रा. हेमंत पाटील, समन्वयक प्रा.प्राची पिसोळकर उपस्थित होते.

      तंत्रज्ञानात होणाऱ्या विविध क्रांती मग ती मोबाईल, इंटरनेट, सौरउर्जा, सेन्सरवर गाडी चालवणे यामध्ये विकास होत आहे. संशोधनातही नवीन शोधायचे व जे आहे त्यातही बदल करायचे. संशोधकांनी केलेल्या संशोधनामध्ये दरवर्षी ६६ टक्के दराने माहितीची वाढ होत आहे. विसाव्या शतकामध्ये पदार्थविज्ञान शाखेमध्ये संगणक, रसायन, जीवशास्र हि सर्व शास्रे एकमेकांमध्ये मिसळून गेली.  आता २१ व्या शतकात नॅनो तंत्रज्ञानाचे महत्वं वाढत असून या तंत्रज्ञानासाठी खर्चिक प्रयोगशाळा, उपग्रह प्रक्षेपण, हायड्रोजन पासून मिळवायची उर्जा, सौरउर्जा, अणुच्या एकत्र येण्याने होणारी उर्जा यातही मोठी क्रांती घडू शकते. ग्रीन केमिस्ट्री यामुळे पर्यावरणाची जपणूकही करता येते. वैद्यकशास्रात मानवाच्या क्षमता वाढविण्यासाठी तंत्रज्ञानांची मोठी मदत होत आहे. नवनवीन संशोधनामध्ये प्राणीशास्त्र, समाजशास्र, मानसशास्र, शिक्षणकला आदींमध्येही मोठ्या प्रमाणामध्ये संशोधनात्मक प्रगती होत असून ती विज्ञानाची खुणावणारी क्षितिजे असल्याचेहि त्यांनी अखेरीस सांगितले.

   अध्यक्षीय मनोगतात संचालक डॉ. प्रशांत देवरे यांनी ‘ डॉ.वसंतराव पवार व्याख्यानमालेच्या माध्यमातून गेली १० वर्ष समाजप्रबोधनाचे काम होत आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना विविध विषयांवर होणारे विचारमंथन भविष्यासाठी प्रेरणादायी ठरेल. डॉ. वसंतराव पवार यांच्या प्रेरणेने सुरु झालेली व्याख्यानमाला सर्वांसाठी अभ्यासपूर्ण ठरेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

       सूत्रसंचलन  प्रा. योगेशकुमार होले यांनी  तर आभार प्रा. विशाखा ठाकरे यांनी मानले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. श्रीमती संगिता पानगव्हाणे यांनी करून दिला. यावेळी प्रा. गोकुळ सानप उपस्थित होते.