नैसर्गिक सौंदर्य व पर्यावरणातील बदल विचारात घेऊन आधुनिक लॅण्डस्केपिंग करणे गरजेचे – आर्किटेकट अमृता पवार
Category : social_projects
के. टी. एच. एम. कॉलेज वाणिज्य प्रयोगशाळा व संशोधन केंद्रातर्फे आयोजित विचारमंथन व्याख्यानमालेसाठी मार्गदर्शक म्हणून जि. प. सदस्या आर्किटेकट अमृता पवार उपस्थित होत्या, अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड होते. अमृता पवार यांनी यावेळी मार्गदर्शन करतांना ‘ लॅण्डस्केपिंग हे वातावरणातील संतुलन राखण्यासाठी पूर्वीपासून जगभर केले जात असल्याचे सांगून मोठं-मोठ्या दगडांचे पिरॅमिड्स,चायनावॉल त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील विहिरी,राजस्थानमधल्या बावडीजोहर पूजा पाठ करण्यासाठी नदीकाठचे घाट हे सर्व लॅण्डस्केपिंग चे प्रकार असून मोगलांच्या काळापासून आनंद मिळविण्यासाठी लॅण्डस्केपिंगची सुरुवात झाली.भारतात प्रामुख्याने समाजाला उपयोगी पडेल असे लॅण्डस्केपिंग केले जाते.भारतात आता शहरांमध्ये बऱ्याचशा इमारतींमध्ये भाजीपाला जीवनउपयोगी वनस्पतींची लागवड करून लॅण्डस्केपिंग सुरु केले आहे.
भारतात हल्ली अनेक खेड्यांमध्ये वाघ, बिबटे, शेतजमींनीमध्ये प्रवेश करतात, याचे कारण आपण त्यांच्या प्रदेशात अतिक्रमण केले आहे. चीनमध्ये सांडपाणी व कचरा यावर प्रक्रिया करून वातावरण पूरक असे लॅण्डस्केपिंग करण्यात आलेले आहे. लॅण्डस्केपिंग चा मोठ्या प्रमाणावर पर्यटनस्थळ म्हणून लोक कसा वापर करतात हे त्यांनी स्लाईड प्रेझेन्टेशन द्वारे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक डॉ.श्रीकांत जाधव यांनी केले.सुत्रसंचलन प्रा.डी.जी.पोटे यांनी तर आभार विभागप्रमुख प्रा.डी.आर.पताडे यांनी मानले.