बहुजन हिताय बहुजन सुखाय

मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक.

Maratha Vidya Prasarak Samaj, Nashik.

Central Office, Shivaji Nagar, Gangapur Road, Nashik-422002, Maharashtra, India.

परिचर्या शिक्षण संस्था, आडगाव येथे ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा

  • -
2

परिचर्या शिक्षण संस्था, आडगाव येथे ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा

मराठा विद्या प्रसारक समाज संचलित परिचर्या शिक्षण संस्था, आडगाव येथे ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा करण्यात आला. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. परिचर्या शिक्षण संस्थेत विद्यार्थ्यानी शिक्षकांप्रती आदर व प्रेम दाखवून शिक्षकदिना निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले. सदर कार्यक्रमात प्रथम वर्ष एम.एस्सी. नर्सिंगचा विद्यार्थी श्री.इरफान पठाण याने शिक्षकांप्रती आदर व्यक्त केला व सदर संस्थेतूनच पदवी घेऊन पुन्हा पदव्युत्तर शिक्षणासाठी पुन्हा नव्याने याच संस्थेत प्रवेश मिळवत शिक्षकांनी दिलेल्या ज्ञानामुळे आज मी प्रगतीपथावर आहे असे समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. पौर्णिमा नाईक यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करतांना ‘ शिक्षकांनी दिलेल्या ज्ञानाची परतफेड फक्त त्यांच्या विद्यार्थ्यांनी केलेली व्यावसायिक प्रगती आणि समाजात मिळवलेल्या उत्तुंग स्थानाने होऊ शकते. विद्यार्थ्यांचे यश बघूनच शिक्षकांना खरा आनंद आणि समाधान मिळते असे प्रतिपादन प्राचार्या डॉ.पौर्णिमा नाईक यांनी केले. सदर कार्यक्रमाचे औचित्य साधून मागील आठवडयात घेण्यात आलेल्या Pre State SNAI Conference Contest मध्ये विजेत्या झालेल्या विद्यार्थ्यांना प्राचार्या डॉ. पौर्णिमा नाईक व उपप्राचार्या श्रीमती कुमारी नूतन यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आले.
महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पौर्णिमा नाईक यांनी नुकतीच Ph.D पदवी संपादन केल्यामुळे, तसेच Federal Organisation For Nursing Services यांच्या तर्फे त्यांना शिक्षक दिनाचे औचित्य साधून डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन पारितोषिक २०२३ हा पुरस्कार जाहिर झाल्याने, संस्थेतर्फे विद्यार्थी आणि शिक्षकांनी त्यांचा सत्कार केला व त्यांच्या भावी वाटचालीस त्यांना शुभेच्छ्या दिल्या.सदर कार्यक्रमाचे आयोजन व्दितीय सेमिस्टर बी एस्सी नर्सिंग व 1st GNM विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन युवराज रौंदळ आणि श्रावणी टर्ले या विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी महाविद्यालयाच्या व्याख्याता श्रीमती सारा टॉमी व श्रीमती नयना शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रतिक सुभाष पाटील याने केले. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम ने करण्यात आली.

OUR RECRUITERS

CONTACT US

  •  Office : Shivaji Nagar,
  • Gangapur Road, Nashik,
  • Nashik-422002,
  • Maharashtra, India.
  • +91-253-2574511,
  • 2573422 , 2573306
  •  Fax : +91-253-2579863
  •  ndmvpsamajnashik@yahoo.co.in

LOCATION