प्राचार्या डॉ. पौर्णिमा नाईक यांचे अभिनंदन
Category : Latest News , social_projects , Uncategorised
म.वि.प्र. समाज परिचर्या शिक्षण संस्थेच्या प्राचार्या डॉ. सौ. पौर्णिमा प्र. नाईक यांनी मालवंचल विद्यापीठ, इंदोर येथून, Ph.D. (Nursing) पदवी प्राप्त केली. त्यानी कोविड-१९ हा आजाराच्या मुळे व्यक्तींच्या शारिरीक आणि मानसिकतेवर होणारे परिणाम या विषयावर शोधप्रबंध सादर केला. त्यांच्या या यशात त्यांना संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, शिक्षणाधिकारी डॉ. डी. डी. लोखंडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेच्या वतीने मा. सरचिटणीस ॲड नितीन ठाकरे, संचालक प्रविण जाधव, शिक्षणाधिकारी डॉ. डी.डी.लोखंडे व संस्थेचे सर्व पदाधिकार्यांनी प्राचार्या डॉ. पौर्णिमा नाईक यांचे अभिनंदन केले व त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.