प्राध्यापक विद्यार्थ्यांचे आदर्श बनावे…
Category : Latest News , social_projects , Uncategorised
विद्यार्थ्यांबरोबर प्राध्यापकांचा संवाद वाढावा, प्राध्यापकांनी स्वतः नवीन गोष्टी शिकाव्यात व आपल्या कृतीतून स्वतःच विद्यार्थ्यांचे आदर्श बनावे, संशोधन करावे, संशोधन पेपर्स,विविध विषयात पेटंट करावेत,नवनिर्मितीत सहभाग घ्यावा , यामुळे विद्यार्थी देखील समाजासाठीआदर्श काम करतील असे प्रतिपादन मविप्र सरचिटणीस ॲड नितीन ठाकरे यांनी केले. के.टी.एच.एम. महाविद्यालयात समाज दिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी समाजासाठी कार्य करीत योगदानाबद्दल उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी के.टी.एच.एम. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आर डी दरेकर यांचा ‘मविप्र’ आदर्श प्राचार्य पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
प्रमुख अतिथी म्हणून कळवण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ रावसाहेब शिंदे यांनी ‘ प्राध्यापक हे विद्यार्थ्यांना व देशाला घडविण्याचे काम करतात, विद्यार्थ्यांमध्ये सर्वांगीण विकास करण्यासाठी प्राध्यापकांनी नेहमी तत्पर असावे. आदर्श विद्यार्थी बनविण्यासाठी विद्यार्थ्यांचा कल ओळखून त्यांना त्यानुसार पारंगत करावे असे सांगितले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आर डी दरेकर यांनी ‘ मागील वर्षी केलेल्या संकल्पांचा आढावा तसेच पुढील वर्षी नवीन संकल्प करण्याचा हा दिवस असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना या निमित्ताने गौरविण्यात येते. मागच्या ५ वर्षात विविध नवनवीन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी आपण सुरु केले आहेत.या अभ्यासक्रमाचा विद्यार्थी मोठ्या प्रमाणात लाभ घेत आहेत. कार्यक्रमास शिक्षणाधिकारी डॉ नितीन जाधव, डॉ बी बी गुंजाळ, कैलास पाटील, सचिन वाघ, मनोज पाटील, एन के गायकवाड, बी बी पाटील, एस एन पगार, अशोक सोनवणे, रामदास भंडारे, प्रा किरण रेडगावकर आदी मान्यवर व्यक्तींसह सर्व स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य व सर्व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. आभार डॉ के एम अहिरे यांनी मानले. सुत्रसंचलन डॉ तुषार पाटील यांनी केले.