मविप्रच्या जनता विद्यालय लहवित चा सुवर्ण महोत्सव समारंभ उत्साहात …
Category : social_projects
मविप्र संचलित जनता विद्यालय लहवित चा सुवर्ण महोत्सव सोमवार दि.२५ फेब्रुवारी रोजी उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून संस्थेच्या सरचिटणीस श्रीमती निलीमाताई पवार ,उपसभापती राघो नाना अहिरे,चिटणीस डॉ.सुनिल ढिकले उपस्थित होते. व्यासपीठावर संचालक भाऊसाहेब खताळे, प्रल्हाद गडाख, सचिन पिंगळे, रामकृष्ण महाराज लहवितकर, अॅड. एन.जी.गायकवाड, मुख्याध्यापक एस.डी.शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सभापती माणिकराव बोरस्ते होते तसेच प्रमुख व्याख्याते म्हणून दै.सकाळ चे कार्यकारी संपादक श्रीमंत माने उपस्थित होते.
यावेळी बोलतांना श्रीमंत माने यांनी ‘ विद्यार्थ्यांनी उच्चशिक्षण घेऊन नोकरी मिळविण्याच्या मागे न लागता आधुनिक पद्धतीने शेती किंवा व्यवसाय केला पाहिजे. कारण आधुनिक तंत्रज्ञानामुळे नोकऱ्यांच्या संधी दिवसेंदिवस कमी होत चाललेल्या आहे. तसेच शेतीला पूरक असा जोडधंदा म्हणून शेतीपूरक व्यवसाय करावा असेही त्यांनी यावेळी बोलतांना सांगितले.
सरचिटणीस श्रीमती निलीमाताई पवार यांनी आपल्या मनोगतात ‘ संस्थेच्या व शाळेच्या विकासासाठी व गुणवत्तेसाठी विद्यार्थी,शिक्षक व पालक यांनी एकत्रित सहकार्य करावे असे सांगितले.
सभापती माणिकराव बोरस्ते यांनी सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त उपस्थित सर्व सभासद,विद्यार्थी,पालक व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.जेष्ठ सभासद व शालेय व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष डॉ.रामकृष्ण महाराज लहवितकर व अॅॅड.एन.जी.गायकवाड यांनी शाळा स्थापनेचा इतिहास सांगतांना जुन्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात कार्यक्रमाचे निमंत्रक व नाशिक ग्रामीण चे संचालक सचिन पिंगळे यांनी शाळेसाठी योगदान दिलेल्या कर्मवीरांच्या व गावातील आजी-माजी सभासदांच्या प्रति आदरभाव व्यक्त करीत त्यांच्याप्रती ऋण व्यक्त केले.
यावेळी ‘ सुवर्णपर्व ह्या स्मरणिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.सुत्रसंचलन श्रीमती ए.डी.लांडे व एस.जी.थेटे यांनी तर आभार आर.व्ही.निकम यांनी मानले. महोत्सवाची सांगता उद्या दि.२६ फेब्रुवारी रोजी हिवरेबाजार चे सरपंच व महाराष्ट्र शासनाच्या आदर्श गाव संकल्पनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांच्या उपस्थितीत होईल.