मविप्रच्या फार्मसी महाविद्यालयाचे जीपॅट परीक्षेत यशाची परंपरा कायम …
Category : social_projects
भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडून (AICTE) दरवर्षी फार्मसी च्या विद्यार्थ्यांकरिता जी पॅट (Graduate Pharmacy Aptitude Test) ही अखिल भारतीय स्तरावरील परीक्षा घेण्यात येते,शैक्षणिक वर्ष २०१९ च्या जी-पॅट परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असुन मविप्रच्या कॉलेज ऑफ फार्मसी मधील आपल्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवत ४० विद्यार्थ्यांनी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.यापैकी सौरभ भोरकडे व साक्षी पगार यांनी ऑल इंडीया रँकमध्ये बारावा क्रमांक पटकाविला. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये ऑल इंडिया रँक १०० च्या आत महाविद्यालयाचे ०९ विद्यार्थी आहेत. सदर परीक्षेसाठी देशातून ३५ हजार विद्यार्थी बसलेले होते.उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षण घेतांना अखिल भारतीय तंत्रशिक्षण परीषद,नवी दिल्ली यांच्याकडून दरमहा १४,४०० रु. शिष्यवृत्ती देण्यात येते.
मविप्र फार्मसी महाविद्यालय हे पुणे विद्यापीठातील सर्वात जुने व सरकारी अनुदान मिळत असलेले एकमेव फार्मसी महाविद्यालय आहे. महाविद्यालयातील विद्यार्थी आज मोठ्या संख्येने नायपर (चंडीगड ),आयसीटी (मुंबई ),बिट्स (पिलानी),यासारख्या ठिकाणी पुढील शिक्षण घेत आहेत तसेच अनेक विद्यार्थी औषधनिर्माण क्षेत्रातील औद्योगिक,शैक्षणिक व संशोधन विभागात देशात व परदेशात शिक्षण घेत आहेत.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ तुषार शेवाळे , सरचिटणीस श्रीमती निलिमाताई पवार , सभापती माणिकराव बोरस्ते , चिटणीस डॉ सुनिल ढिकले , उपसभापती राघोनाना अहिरे ,सर्व संचालक , शिक्षणाधिकारी डॉ एन एस पाटील ,प्राचार्य डॉ डी व्ही डेर्ले,प्रा.अशोक पिंगळे,एम फार्म कोर्स समन्वयक व उपप्राचार्य डॉ.मिलिंद वाघ व शिक्षकेतर सेवकांनी अभिनंदन केले आहे.