मवि’प्र पत्रिका’ प्रकाशन
Category : Latest News , social_projects , Uncategorised
मविप्र समाजाच्या मवि’प्र पत्रिका’ या बारा पानांच्या मुखपत्राचे प्रकाशन समाजदिनाच्या मुहूर्तावर नामदार दादाजी भुसे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. मविप्र संस्थेच्या वाटचालीचा, कारभाराचा धांडोळा पारदर्शकतेने संस्थेच्या सभासद, शिक्षक-सेवक, पालक यांच्यासमोर यानिमीत्ते मांडला जाणार आहे. तज्ञ लेखकांचे शिक्षणविषयक अत्यंत कसदार लेखन. प्रभावी आणि आकर्षक मांडणी व स्वरूप, संस्थेत होणारे नवे प्रयोग-उपक्रम, विद्यार्थी-शिक्षक यांची विविध क्षेत्रातील स्पृहणीय कामगिरी, विद्यार्थ्यांच्या व्यवसाय व नोकरीसाठी संस्थेतर्फे केले जात असलेले प्रयत्न आणि समाजमध्ये आधुनिक शिक्षणाविषयी जागरूकता निर्माण व्हावी यासाठी केलेला जागर ही या नियतकालिकांची खास वैशिष्ट्ये असणार आहेत. या पत्रिकेचे मुख्य संपादक म्हणून संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली असून कार्यकारी संपादक म्हणून प्रा. दिलीप पवार धुरा सांभाळत आहेत. मविप्रच्या कार्यकारी मंडळ व तालुका सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.डॉ.अशोक पिंगळे, प्राचार्य डॉ.भास्कर ढोके, प्राचार्य श्री.प्रशांत पाटील, प्रा.अशोक सोनवणे, प्रा.डॉ.शंकर बोऱ्हाडे, सौ.सुरेखा बोऱ्हाडे हे संपादकीय मंडळ मविप्र पत्रिकेला आकार देत आहे. मविप्र पत्रिकेचा प्रकाशित झालेला पहिला अंक लवकरच सर्व सभासदांच्या हाती घरपोच पडेल याची व्यवस्था करण्यात आली आहे.