मविप्र संस्था संचलित औद्योगिक प्रशिक्षण संस्था नाशिक व नाशिक जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय आयोजित रोजगार मेळाव्यात 278 विद्यार्थ्यांची निवड
Category : Latest News , social_projects , Uncategorised
मविप्र संस्था संचलित औद्योगिक प्रशिक्षण संस्था नाशिक व नाशिक जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय आयोजित रोजगार मेळाव्यात 278 विद्यार्थ्यांची निवड….बुधवार दिनांक- २३ ऑगस्ट रोजी मविप्र समाज संस्थेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था नाशिक गंगापूर रोड आयटीआय व नाशिक जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय नाशिक यांचे संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी रोजगार मेळावा घेण्यात आला. सदर मेळाव्यासाठी महिंद्रा अँड महिंद्रा, एल.& टी. पनवेल व अहमदाबाद, फोर्चुना इंजिनिअरिंग, किलोस्कर ऑइल इंजिन, चिमॅटो इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड, फेबेक्स इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड मेमको इंजिनिअरिंग व बूस्ट इलेक्ट्रोनिक्स आदि कंपन्यांनी सहभाग नोंदविला. सदर मेळाव्यास जिल्ह्यातून विभागातून ३७६ विद्यार्थ्यांनी हजेरी लावली त्यापैकी सर्व कंपन्या मिळून २७८ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. रोजगारासंदर्भात प्रशिक्षणार्थ्यांना ऑफर लेटर देण्यात येणार आले. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस अॅड. डॉ.नितीन ठाकरे व श्री.वाकडे ,सहसंचालक नाशिक विभागीय कार्यालय, इंद्रभान काकड जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय नाशिक यांनी व कार्यकारी मंडळांनी निवड झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांचे अभिनंदन करताना आपण असेच वेगवेगळे उपक्रम राबवून तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊ, त्यासाठी आम्ही कट्टी बद्ध आहोत असे संस्थेचे सरचिटणीस अॅड. डॉ.नितीन ठाकरे यांनी मार्गदर्शनात संबोधले. याप्रसंगी संचालक श्री. शिवाजी गडाख, अॅड. लक्ष्मण लांडगे शिक्षणाधिकारी डॉ विलास देशमुख व कॉलेज टीचरचे संचालक कैलास बोरस्ते व बाळासाहेब टर्ले उपस्थित होते. तरुणांनी संधीचा योग्य फायदा घेऊन मिळेल ते काम करावे असे आवाहन वाकडे सहसंचालक यांनी केले. याप्रसंगी ९ कंपन्यांचे प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे सरचिटणीस अॅड. डॉ.नितीन ठाकरे यांच्या हस्ते आयटीआय मधील महेंद्र माळी या विद्यार्थ्यांचे जपान येथे नोकरीसाठी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विविध कंपन्यांच्या एच आर डिपार्टमेंटचे प्रतिनिधी, स्थानिक संचालक श्री लक्ष्मण लांडगे, निफाड तालुका संचालक शिवाजी गडाख, शिक्षणाधिकारी डॉ विलास देशमुख , आयटीआयचे प्राचार्य बोरस्ते व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. प्रास्ताविक प्राचार्य संजय बोरस्ते यांनी केले. सूत्रसंचालन भाऊसाहेब गडाख यांनी केले.