मविप्र संस्थेतर्फे शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूंचा सत्कार
Category : social_projects
महाराष्ट्र शासनाच्या वतीने नुकतेच शिवछत्रपती पुरस्कार प्रदान करण्यात आले.यात जिल्ह्यातील रोशनी अशोक मुर्तडक, मोनिका आथरे, अक्षय देशमुख, राजेंद्र सोनार, पूजा जाधव, संजय होळकर हे सहाही पुरस्कारार्थी मविप्र संस्थेचे आजी-माजी खेळाडू, शिक्षक असल्यामुळे मविप्र संस्थेच्या वतीने खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेच्या सरचिटणीस श्रीमती निलीमाताई पवार, सभापती माणिकराव बोरस्ते चिटणीस डॉ. सुनिल ढिकले, उपसभापती राघोनाना अहिरे, संचालक नाना महाले, रायभान काळे, उत्तमबाबा भालेराव, डॉ.विश्राम निकम, डॉ.जयंत पवार, डॉ.प्रशांत देवरे, दत्तात्रय पाटील, अशोक पवार, प्रल्हाद गडाख, प्रा.नानासाहेब दाते, गुलाब भामरे, सौ.नंदा सोनवणे, शिक्षणाधिकारी डॉ. डी.डी. काजळे, डॉ.आर.डी.दरेकर, प्रा.एस.के.शिंदे, सी.डी.शिंदे, डॉ.एन.एस. पाटील उपस्थित होते.