विद्यार्थी केंद्रबिंदू समजून कार्य करणार …सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे
Category : Latest News , social_projects , Uncategorised
संस्थेच्या वतीने इयत्ता ११ वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी प्रात्यक्षिक सोपे व्हावे याकरिता हँडबुक व जर्नल्स संस्थेच्या तज्ञ प्राध्यापकांच्या मदतीने प्रेसमध्ये तयार करण्याचा निर्णय घेतला. गणितासाठी प्रॅक्टिकल व हँडबुक एकत्रित केल्याने पुस्तकांचे ओझे कमी होणार आहे. संस्थेच्या प्राध्यापकांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग करत अतिशय सुंदर ले आउट असलेले थेअरी व प्रॅक्टिकल साठी उपयोगी पडेल अशी हस्तपुस्तिका तयार केली. तसेच यापुढे विद्यार्थी केंद्रबिंदू समजून कार्य करणार असल्याचे प्रतिपादन सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे यांनी केले. ते के टी एच एम महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी तयार केलेल्या हस्तपुस्तिकेच्या प्रकाशन प्रसंगी के ८ सभागृहात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे शिक्षणाधिकारी प्रा अशोक पिंगळे,प्राचार्य डॉ आर डी दरेकर,उपप्राचार्य व्हि एस सोनवणे उपस्थित होते. ॲड. ठाकरे पुढे म्हंजले की, प्रिंटींग प्रेस च्या माध्यमातून समाजपत्रिका,शालेय साहित्य निर्मिती इ.नवनवीन उपक्रम सुरु करण्याचा मानस आहे. तसेच गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रेसच्या नफ्यात दुपटीने वाढ झालेली असून संस्थेच्या उदाजी कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांसाठी २२ मजली टॉवर उभारणार असून विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या सोई उपलब्ध करून देऊ असे ही त्यांनी यावेळी सांगितले. शिक्षणाधिकारी प्रा अशोक पिंगळे यांनी हस्तपुस्तिका निर्मितीमागील प्रवास सांगतांना ‘संस्थेच्या विद्यार्थ्यांना मार्केट रेट पेक्षा कमी दरात व सर्वसमावेशक रेकॉर्डबुक संस्थेतील प्राध्यापकांच्या मदतीने अफलातून तयार केली आहे. के टी एच एम महाविद्यालयासोबतच संस्थेच्या इतर महाविद्यालयांसाठी देखील तयार करण्याचा मानस असून संस्थेच्या प्रिंटींग प्रेस चे वर्क कल्चर खरोखर वाखाणण्याजोगे व गुणवत्तापूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले. प्राचार्य डॉ आर डी दरेकर यांनी प्रास्ताविकात ‘ विद्यार्थ्यांचा गुणात्मक विकास व आर्थिक मदत हे उद्देश डोळ्यासमोर ठेऊन संस्थेने कमी किमतीत अधिक माहितीपूर्ण,अर्थपूर्ण व परिणामकारक देण्याचा प्रयत्न केला असून संस्थेच्या या उपक्रमांकडे सर्वांनी सकारात्मकतेने बघावे असे सांगितले. सूत्रसंचालन प्रा अविनाश दवंगे यांनी तर आभार उपप्राचार्य प्रा व्हि एस सोनवणे यांनी मानले. यावेळी प्रा अविनाश गंगाधर दवंगे यांनी संस्थेच्या जऊळके वणी शाळेतील विद्यार्थांचा विमा स्वखर्चाने काढला,त्या रकमेचा धनादेश त्यांनी सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला.