वृक्षारोपणाच्या कार्यक्रम
Category : Latest News , social_projects , Uncategorised
मराठा विद्या प्रसारक समाजाच्या होरायझन अकॅडेमी, मखमलाबाद येथे शुक्रवार दिनांक २५ ऑगस्ट २०२३ रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर नाशिक आणि निर्मल गोदा गौरव फाउंडेशन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेल्या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले म.वि.प्र समाजाचे सरचिटणीस नितीन ठाकरे यांनी वृक्ष संवर्धन कराल तरच पुढच्या भावी पिढीला जगण्यासाठी शुद्ध हवा व जीवनावश्यक वस्तू उपलब्ध होतील व वृक्ष संवर्धन ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले. याप्रसंगी संचालक रमेश आबा पिंगळे , लक्ष्मण लांडगे , प्रा अशोक पिंगळे, मा.श्री. शंकरराव पिंगळे , भास्करराव पवार, मा. श्री .सचिन कुशारे, श्री गणेश ढगे, डॉ. अशोक बोऱ्हाडे, मधुकर पिंगळे , गोकुळ पाटील , शिवाजी पिंगळे, निवृत्ती पिंगळे, राजेंद्र डोखळे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.श्रीमती सुरेखा बोऱ्हाडे, श्रीमती कल्पनाताई पिंगळे तसेच शाळेच्या प्राचार्य श्रीमती सोनाली गायकर व इतर शालेय कमिटी सदस्य आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात वृक्षारोपणाने झाली. प्राचार्या सोनाली गायकर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून शालेय अहवाल सादर केला. तसेच श्रीमती सुरेखा बोऱ्हाडे यांनी वृक्षसंवर्धनाविषयी माहिती व महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. राजेंद्र डोखळे यांनी मोलाचे मार्गदर्शन यावेळेस केले. अध्यक्षीय भाषणात नितीन ठाकरे यांनी वृक्ष संवर्धनाविषयी आपले बहुमोल विचार मांडून विद्यार्थ्यांना वृक्ष संवर्धन करणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले.आभार प्रदर्शन शालेय कमिटी अध्यक्ष शंकरराव पिंगळे यांनी केले.