शिक्षक दिनानिमित्त र्निवृत्त शिक्षक व प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार
Category : Latest News , social_projects , Uncategorised
५ सप्टेंबर डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षकदिन म्हणून साजरा केला जातो ,आयटीआय मध्ये शिक्षक दिनानिमित्त र्निवृत्त शिक्षक व प्रथम आलेल्याचा सत्कार तसेच विविध क्षेत्रात नेत्रदिपक कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सभापती श्री बाळासाहेब क्षीरसागर होते.संस्थेचे सरचिटणीस ॲड .नितीन ठाकरे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी व सेवकांचा सत्कार संपन्न झाला.तसेच आयटीआय व कृषी महाविद्यालय च्या वतीने संस्थेचे उपसभापती डी बी अण्णा मोगल, उपाध्यक्ष श्री विश्वास बापू मोरे संचालक ॲड लक्ष्मण लांडगे , संचालक श्री शिवाजी आप्पा गडाख, संचालक ॲड संदीप गुळवे उपस्थित होते.
मनोगतात सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी ‘ शिक्षक हा विद्यार्थ्यांवर संस्काराचे काम करीत असतो तसेच शिक्षक हा विद्यार्थी व समाज घडविण्याचे कार्य करतो , संस्थेतील शिक्षक व विद्यार्थी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर यशस्वी झाल्याने संस्थेची मान उंचावते असेही सभापतींनी यावेळी सांगितले.
उपसभापती श्री डी बी अण्णा मोगल म्हणाले की ‘ विद्यार्थ्यांमध्ये उर्जा निर्माण करण्याचे कार्य शिक्षकांनी करावयाचे असून विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून मार्गक्रमण करणे ही शिक्षकाची जबाबदारी आहे . गुणवंत विद्यार्थी ही संस्थेची खरी ओळख असून सर्व गुणवंत विद्यार्थी व सेवानिवृत्त सेवकांचे त्यांनी यावेळी अभिनंदन केले.
सरचिटणीस ॲड नितीन ठाकरे यांनी ‘ जुनी व अनुभवी शिक्षकांची पिढी निवृत्त होऊन बाहेर पडतांना खंत वाटत असल्याचे सांगुन , शिक्षक हा निर्भय व नैतिक अधिष्ठान असलेला असावा, तसेच विद्यार्थ्यांचा बौद्धिक अंधकार नाहीसा करतो तोच खरा शिक्षक असल्याचेही ते म्हणाले. संगणकाच्या युगात विद्यार्थ्यांकडे ज्ञानाचे भांडार खुले आहे , सध्याच्या घडीला चांगला माणूस घडविण्यासाठी शिक्षकांना प्रयत्न करणे गरजेचे आहे तसेच शिक्षकांनी आशावादी राहून उद्योगशील बनवावे. मागील १० ते १५ वर्षांमध्ये आयटीआय मध्ये सर्वात मोठा रोजगार मेळावा घेऊन विद्यार्थ्यांना रोजगार मिळाला तसेच आयटीआयची १०० टक्के प्रवेशाच्या दिशेने वाटचाल गौरवास्पद आहे असेही डॉ. ॲड नितीन ठाकरे म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य श्री संजय बोरस्ते यांनी केले यांनी ,सूत्रसंचालन भाऊसाहेब गडाख यांनी तर आभार कृषी महाविद्यालयाचे प्रा चव्हाण यांनी मानले