बहुजन हिताय बहुजन सुखाय

मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक.

Maratha Vidya Prasarak Samaj, Nashik.

Central Office, Shivaji Nagar, Gangapur Road, Nashik-422002, Maharashtra, India.

संस्थेच्या कामाचा सरकार दरबारी पाठपुरावा करणार- ना.दादाजी भुसे , सार्वजनिक बांधकाम व सार्वजनिक उपक्रम मंत्री

  • -
Program1

संस्थेच्या कामाचा सरकार दरबारी पाठपुरावा करणार- ना.दादाजी भुसे , सार्वजनिक बांधकाम व सार्वजनिक उपक्रम मंत्री

१९१४ साली कर्मवीरांनी लावलेले रोपटे वाढवण्यासाठी प्रत्येकाने योगदान देऊन आज त्याचे वटवृक्षात रुपांतर झालेले आहे.रावसाहेब थोरातांनी संस्थेसाठी आयुष्य वेचले.गणपतदादा मोरे,डी आर भोसले,आण्णासाहेब मुरकुटे यांनी देखील मोठे कार्य उभारले.गावोवावी फिरून शेतकऱ्यांच्या मुलांनी शिक्षण घेतले पाहिजे यासाठी प्रयत्न केले. प्रतिकूल परिस्थितीत कर्मवीरांनी उभारलेले कार्य दीपस्तंभाप्रमाणे आहे असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम व सार्वजनिक उपक्रम मंत्री ना.दादाजी भुसे यांनी केले ते मविप्र संस्थेच्या समाजदिन सोहळ्याप्रसंगी संस्थेच्या रावसाहेब थोरात सभागृहात बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ सुनिल ढिकले होते, यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे, सभापती बाळासाहेब क्षिरसागर,उपाध्यक्ष विश्वास मोरे,चिटणीस दिलीप दळवी,उपसभापती डी बी मोगल,माणिकराव बोरस्ते,डॉ तुषार शेवाळे,अरविंद कारे,ॲड दौलतराव घुमरे,डॉ अभिमन्यू पवार,डॉ विश्राम निकम,अंबादास बनकर, डॉ विलास बच्छाव,नारायण हिरे,नाना महाले,सुरेश डोखळे, संचालक ॲड.संदीप गुळवे,ॲड लक्ष्मण लांडगे,ॲड आर के बच्छाव,कृष्णाजी भगत,नंदकुमार बनकर,रविंद्र देवरे,डॉ प्रसाद सोनवणे,शिवाजी गडाख,रमेश आबा पिंगळे,शोभा बोरस्ते ,शालन सोनवणे, सेवक संचालक डॉ एस के शिंदे,सी डी शिंदे,जगन्नाथ निंबाळकर,शिक्षणाधिकारी प्रा अशोक पिंगळे,डॉ भास्कर ढोके,डॉ विलास देशमुख,डॉ नितीन जाधव,डॉ डी डी लोखंडे, डॉ अजित मोरे,प्रा बी डी पाटील,प्रा दौलत जाधव उपस्थित होते. यावेळी संस्थेच्या संकेतस्थळाचे उद्घाटन व मविप्र पत्रिकेचे प्रकाशनमान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
ना.भुसे यांनी पुढे बोलतांना ‘ मविप्र संस्थेने जिल्हा पातळीवर काम करतांना राज्यात दुसऱ्या क्रमांकावर घेतलेली झेप हा मोठा पराक्रम आहे. कार्यकारी मंडळाने १ वर्षात चांगले कार्य केले असून शासन पातळीवर मान्यता व निधी मिळवून देण्यास मी स्वतः प्रयत्न करेन. संस्थेच्या मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल च्या माध्यमातून चांगली आरोग्यसेवा उभारली असून येत्या काळात तालुका पातळीवर ओपीडी सेवा सुरु करावी,संस्थेचा सभासद या नात्याने आपण मंत्रालयातील संस्थेच्या कामाचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले. सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे यांनी आपल्या मनोगतात ‘ सत्यशोधक विचारांतून संस्थेची उभारणी झाली असून संस्थेला कर्मवीर,आश्रयदाते,शिक्षकांची मोठी परंपरा लाभली असून रावसाहेब थोरात यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाज घडविण्यासाठी प्रयत्न केले. मविप्र संस्थेचे संकेतस्थळ व समाज पत्रिका यांद्वारे संस्थेच्या उपक्रमांची माहिती सर्वांना होणार असून दर ३ महिन्यांनी समाज पत्रिका सभासदांना पाठवली जाईल. तसेच संस्था आयसर,एम एस एफ डी ए च्या माध्यमातून शिक्षकांना अत्याधुनिक प्रशिक्षण देत असून संस्थेच्या मानव संसाधन विकास केंद्रामार्फत आतापर्यंत ३५०० शिक्षकांना प्रशिक्षण दिले आहे. संस्थेने गेल्या वर्षात ५० कोटींची कर्जफेड केली. उदाजी बोर्डिंग आवारात २१ मजली वसतिगृहाची उभारणी करणार आहे. तसेच संस्थेची एम व्हि पी युनिव्हर्सिटी कडे वाटचाल सुरु आहे.येत्या काळात आय बी एम या आंतरराष्ट्रीय संस्थेसोबत करार केला जाईल.संस्थेची आर्थिक परिस्थिती उत्तम असून येत्या काळात संस्था आयुर्वेद महाविद्यालय व व्हेटर्नरी महाविद्यालय उभारणीसाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी आपल्या मनोगतात ‘ ग्रामीण भागातील, वंचितांच्या,सर्व समाजाच्या मुलांच्या शिक्षणाची सोय करण्यासाठी मविप्र संस्थेच्या रूपाने कर्मवीरांनी संस्थेच्या माध्यमातून ज्ञानाची दालने उघडी केली. ७ विद्यार्थ्यांवर सुरु झालेली संस्था आज दोन लाख विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहे. कर्मवीरांच्या त्यागाची,कार्याची ओळख नवीन पिढीला व्हावी या हेतूने समाजदिन साजरा केला आहे. शासन पातळीवरील संस्थेच्या व सेवकांच्या अडचणी सोडविण्यासाठी भुसे साहेबांनी सहकार्य करावे असे सांगितले. अध्यक्षीय मनोगतात डॉ सुनिल ढिकले यांनी ‘ भारत हा शिक्षणामुळे जगात अग्रेसर असून राजर्षी शाहू महाराज,म.फुले,सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाला महत्व दिले.चांगली पिढी घडविण्यासाठी शिक्षण महत्वाचे आहे. शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात संस्थेचे मोठे योगदान दिलेले आहे.कोणत्याही देशाचे मूल्यमापन हे त्या देशातील विद्यापीठ व संधोधानातून ठरते असे सांगितले. प्रास्ताविकात उपसभापती डी बी मोगल यांनी संस्थेच्या वाटचालीचा व कर्मवीरांच्या कारकीर्दीचा आढावा घेतला. समाजदिनाचे औचित्य साधून संस्थेतील सेवक,विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला, यामध्ये लोककला गजाभाऊ बेणी पुरस्कार मयूर देशमुख यास,द गो खैरनार गुरुजी पुरस्कार सिन्नर सार्वजनिक वाचनालयास,कै.मुरलीधर माने युवा पुरस्कार वैभव भालेराव यास, कविवर्य केशव मेश्राम पुरस्कार योगिता टिळे व प्रणोती चव्हाण यांना, ॲड उत्तमराव ढिकले सर्वोत्कृष्ट कबड्डी खेळाडू पुरस्कार आकाश शिंदे यास तर आदर्श प्राचार्य पुरस्कार डॉ आर डी दरेकर यांना, आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार उत्तम बस्ते,अनिता घोलप यांना,आदर्श शिक्षक पुरस्कार ज्ञानेश्वर पवार.मनिषा सोनवणे यांना आदर्श लिपिक शशिकांत पाटील,मधुकर सोनवणे यांना,उपक्रमशील मुख्याध्यापक पुरस्कार प्रदीप धुळे, निधी मिश्रा आणि सुवर्ण पाटील यांना प्रदान करण्यात आला. सूत्रसंचालन डॉ तुषार पाटील यांनी तर आभार उपाध्यक्ष विश्वास मोरे यांनी मानले .


OUR RECRUITERS

CONTACT US

  •  Office : Shivaji Nagar,
  • Gangapur Road, Nashik,
  • Nashik-422002,
  • Maharashtra, India.
  • +91-253-2574511,
  • 2573422 , 2573306
  •  Fax : +91-253-2579863
  •  ndmvpsamajnashik@yahoo.co.in

LOCATION