बहुजन हिताय बहुजन सुखाय

मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक.

Maratha Vidya Prasarak Samaj, Nashik.

Central Office, Shivaji Nagar, Gangapur Road, Nashik-422002, Maharashtra, India.

सोशल चॅलेंज परिसंवाद

  • -

सोशल चॅलेंज परिसंवाद

Category : social_projects

मराठा विद्या प्रसारक समाज संचलित समाजकार्य महाविद्यालयात सोशल चॅलेंज 2019 या थीम अंतर्गत एक दिवसीय परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या परिसंवाद प्रसंगी उद्घाटन कार्यक्रमात विचारमंचावर पाणी फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री सत्यजित भटकळ, म वि प्र समाजाचे संचालक सचिन पिंगळे, डॉ प्रशांत देवरे, निवृत्त प्राध्यापक व पाणी तज्ञ श्री अशोक सोनवणे, समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विलास देशमुख, प्रा. प्रतिमा पवार उपस्थित होते.

सर्वप्रथम दीपप्रज्वलनाने परिसंवादाचे उद्घाटन करण्यात आले. पाणी फाउंडेशन चे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री सत्यजित भटकळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, यावेळी श्री भटकळ यांनी सत्यमेव जयते पासूनचा पाणी फाउंडेशन पर्यंतचा प्रवास सांगितला. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा, स्पर्धेचे नियम आणि मनसंधरणातून जलसंधारण हे ब्रीद घेऊन कार्याची केलेली सुरुवात सांगितली. प्रशिक्षण, वैज्ञानिक दृष्टिकोन, लोकांच्या सहभागातून पाणी फाउंडेशन कॅटॅलिस्ट ची भूमिका करते असेही त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनात सांगितले. 24 जिल्हे, 75 तालुके व चार हजार गावांपर्यंत पोहोचून लोकांना सहभागी करून घेण्याचा यशस्वी आलेख समजावून विद्यार्थ्यांनाही सहभागी होण्याचे आवाहन माननीय श्री. सत्यजित भटकळ यांनी केले. परिसंवादाच्या उद्घाटन कार्यक्रमात प्रमुख अतिथी व मराठा विद्या प्रसारक समाजाचे संचालक मा. श्री. सचिन पिंगळे यांनी समाजकार्य महाविद्यालयाचे अभिनंदन केले व सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी समाजकार्य महाविद्यालयाची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन केले. या परिसंवादा च्याउद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष व मराठा विद्या प्रसारक समाजाचे संचालक डॉ.प्रशांत देवरे यांनी लोकांमध्ये एकजूट असेल तर कोणतेही कार्य थांबणार नाही आणि पाणी प्रश्नांवर काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था व शासन यांच्या विषयी मार्गदर्शन केले.

प्रथम सत्रात निवृत्त प्राध्यापक व पाणी तज्ञ अशोक सोनवणे यांनी भारतातील जलसंवर्धनाची पार्श्वभूमी व सद्यस्थिती विद्यार्थ्यांसमोर मांडली. त्यासोबत पाणी व्यवस्थापन पाण्याचे नियोजन कसे करावे हे सांगितले. राळेगणसिद्धी, हिवरेबाजार या गावांची लोकसहभागातून जलव्यवस्थापन केल्या बद्दल मार्गदर्शन ही त्यांनी केले.

द्वितीय सत्रात समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थी अक्षय बोंबले व काजल थोरात, नीलम मोजाड, पाटील गौरव यांनी जलनीती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच जलसाक्षरता व व्यवस्थापन या विषयावरील शोधनिबंध सादर केले.
द्वितीय सत्रात सॅमसोनाईट साऊथ एशिया प्रा लि चे सहाय्यक संचालक मिलिंद वैद्य यांनी इगतपुरी तालुक्यातील 11 गावातील जलसंवर्धनाची केस स्टडी सादर केली. सॅमसोनाईट ची कार्यपद्धती सांगितली प्रामुख्याने पूर्व सर्वेक्षण, कार्याची पद्धती, चालू करतो पाठपुरावा रणनीती काम झाल्यानंतर चा आढावा कसा घेतला गेला व त्यातून आठ धरणे व तीन विहिरी बांधले तसेच चार लाखांच्या पुढे इगतपुरी परिसरात वृक्षारोपण केले. याचीही विद्यार्थ्यांसमोर मांडणी केली. तसेच बॉस इंडिया फाउंडेशन, बंगलोर येथील क्षेत्र प्रकल्प संचालक सुशांत राऊत यांनी जलयुक्त शिवार अभियान व पाच गावातील केलेले कार्य विद्यार्थ्यांच्या समोर केस स्टडी च्या रूपाने सादर केले. त्यामध्ये लक्ष्मण पाडा, पहिने, सामुंडे, वाडीपाडा या गावांचे जलसंवर्धनातून , शेती व पशुसंवर्धन भाजीपाला लागवड करून त्यांना फायदा झाला. दोनशे कुटुंबांचा सहभाग किती महत्त्वाचा होता हे देखील श्री राऊत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनातून सांगितले. तसेच या गावांवर आधारित चित्रफितही दाखविण्यात आली.

समारोप सत्रात प्रा. चंद्रप्रभा निकम यांनी परिसंवादाचे अहवाल वाचन केले. प्रा डॉ घनश्याम जगताप यांनी आभार व्यक्त केले.सोशल चॅलेंज 2019 च्या एक दिवशीय परिसंवादाचे प्रास्ताविक प्रा. प्रतिमा पवार यांनी केले,स्वागतपर मनोगत समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विलास देशमुख यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.सोनल बैरागी, पाहुण्याचा परिचय प्रा. प्रतिमा पगार, प्रा मनीषा शुक्ल यांनी केला तसेच आभार प्रदर्शन प्रा डॉ घनश्याम जगताप यांनी केले. या वेळी विविध सामाजिक संस्था प्रतिनिधी, विद्यार्थी व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थीत होते.