बहुजन हिताय बहुजन सुखाय

मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक.

Maratha Vidya Prasarak Samaj, Nashik.

Central Office, Shivaji Nagar, Gangapur Road, Nashik-422002, Maharashtra, India.

Author Archives: Editorial Team

  • -

“माननीय अॅड. यशोमती ठाकूर यांनी म.वि.प्र. संग्रहालयास भेट”

Category : CurrentPosts

माननीय अॅड. यशोमती ठाकूर यांनी म.वि.प्र. संग्रहालयास नुकतीच भेट दिली, त्यांच्या सोबत आदरणीय सरचिटणीस श्रीमती नीलिमाताई पवार, सर्व पदाधिकारी व मान्यवर.


  • -

Test Post Current News

Category : CurrentPosts

Test Post Current News Data Text


  • -

मविप्रच्या कोव्हिड रुग्णालयात ६३६ रुग्णांची करोनावर मात

Category : Uncategorised

मविप्रच्या डॉ. वसंतराव पवार वैदयकिय महाविदयालयाच्या रुग्णालयात ९०१ कोविड रुग्ण उपचारासाठी दाखल झाले होते. त्यात ६३६ रुग्ण बरे झाले असून यात पोलीस व त्यांचे नातेवाईक आणि सामान्य नागरिकांचा समावेश आहे. रुग्णालयातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१ टक्के इतके आहे. तर महाविद्यालयातील कोविड टेस्टिंग लॅब मध्ये जुलै अखेर तेरा हजार चाळीस रुग्णांचे करोना स्वॅब टेस्ट करण्यात आले आहेत. महाविद्यालयाच्या डेडिकेटेड कोविड रुग्णालय (डीसीएच) ६० खाटा तर कोविड केयर सेंटर मध्ये १०० खाटांचे रुग्णालय आहे. या कोविड रुग्णालयातील डीसीएच मध्ये अति गंभीर बाधित रुग्णांसाठी आरआयसीयु या विशेष अतिदक्षता कक्षात चोवीस तास तज्ञ् डॉक्टरांच्या देखरेखीखाली व सल्ल्याने औषधोपचार केले जातात. निवासी डॉक्टर,फिजिओथेरपी,नर्सिंग,परिचारिका, वॉर्डबॉय, आया यांच्या सेवा तसेच डेडिकेटेड कोविड रुग्णालयाच्या सुसज्ज कक्षात ऑक्सिजनची सुविधा असलेल्या खाटा , व्हेंटिलेटर , मोबाईल एक्स-रे , लॅब अश्या सुविधा चोवीस तास उपलब्ध आहे. तसेच वैद्यकीय उपचार व्यवस्थापनासोबतच रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेतांना चांगल्या दर्जाचे जेवण, शुद्ध पिण्याचे पाणी , गरम पाणी पुरविले जात आहे. मविप्रच्या रुग्णालयात मागील १ मेला पहिला करोना बाधित रुग्ण दाखल झाला होता.

डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात करोनाच्या प्रारंभी च्या काळात कोरोना विषयक स्वतंत्र स्क्रिनिंग ओपीडी सुरु करण्यात आली. ती आजही सुरु असून या ठिकाणी रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाची तपासणी करण्यात येते व प्राथमीक लक्षणे असलेली व संशयित रुग्णांना वेगळे करण्यात येते. आजवर या कोविड बाह्यरुग्ण विभागात जुलै अखेर ८१७५ इतक्या रुग्णांची कोरोनाविषयक प्राथमिक तपासणी करण्यात आली आहे.


  • -

  • -

जनता विद्यालय गांधीनगर चा सुवर्ण महोत्सव संपन्न…

Category : social_projects

मविप्र संचलित जनता विद्यालयाच्या सुवर्ण महोत्सव सांगता समारंभ संपन्न झाला,यावेळी प्रमुख वक्ते म्हणून जेष्ठ साहित्यिक उत्तमराव कांबळे उपस्थित होते.तसेच कार्यक्रमप्रसंगी संस्थेच्या सरचिटणीस श्रीमती निलीमाताई पवार,चिटणीस डॉ.सुनिल ढिकले,संचालक नाना महाले,भाऊसाहेब खताळे,प्रल्हाद गडाख,सचिन पिंगळे,माजी महापौर अशोक दिवे,नगरसेविक  राहुल  दिवे, आशा तडवी,सुषमा पगारे,सेवक संचालक प्रा.नानासाहेब दाते,गुलाबराव भामरे,सौ.नंदा सोनवणे,शिक्षणाधिकारी प्रा.एस.के.शिंदे,सी.डी.शिंदे, स्कूल कमिटी सदस्य नामदेव आढाव,योगेश कासार,रामदास लांडगे,गोपीचंद पवार,साहेबराव पवार,योगेश नन्नावरे,अनिल गांगुर्डे,वाल्मीकराव जाधव,शंकरराव खेलूकर,संजय खैरनार,सिद्धार्थ भालेराव,कृष्णकुमार पाटील उपस्थित होते. अध्यक्षस्थानी सभापती माणिकराव बोरस्ते होते.

उत्तमराव कांबळे यांनी आपल्या मनोगतात ‘ सध्याच्या घडीला जुन्या आणि नव्या शिक्षणपद्धतीची सांगड घालणे गरजेचे आहे.तसेच विद्यार्थ्यांमध्ये   सामाजिक जाणीव निर्माण करावी असे सांगत मविप्र संस्था हि अनेक उपक्रमांच्या माध्यमातून परिपूर्ण विद्यार्थी घडविण्यासाठी कायम कार्यरत असल्याचे सांगत संस्थेने आजपर्यंत अनेक सुजाण नागरिक व विद्यार्थी घडविल्याचे सांगितले.

सरचिटणीस श्रीमती निलीमाताई पवार यांनी ‘विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था कायम प्रयत्न करीत असून नवीन शैक्षणिक वर्षापासून दर शनिवार हा अक्टीव्हीटी दिवस म्हणून साजरा केला जाईल तसेच शनिवार हा विनादप्तराचा वार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय मनोगतात सभापती माणिकराव बोरस्ते यांनी संस्थेच्या उभारणीत कर्मवीरांनी मोठे योगदान दिलेले असून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस असून संस्था कायम विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्नवत राहील असे सांगितले.

माजी महापौर अशोक दिवे यांनी त्यांच्या जडण-घडणीत शाळेचा मोठा वाटा असून शाळेच्या ५० वर्षाच्या वाटचालीचा साक्षीदार असल्याचे सांगतांना सुवर्ण महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.प्रास्ताविकात मुख्याध्यापक एस.एम.बच्छाव यांनी शाळेच्या ५० वर्षाच्या वाटचालीचा आढावा घेतला.सुत्रसंचलन श्रीमती सुनिता कटाळे यांनी तर आभार श्रीमती माधवी गांगुर्डे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी पर्यवेक्षक बी.जे.बच्छाव,आर.एस.बच्छाव,एन.के.निकम,पी.जी.मुठाळ,आर.के.देवरे,एस.आर.नवले,एस.एल.जाधव व अभिनव बालविकास मंदिर चे कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला वृक्षारोपण करण्यात आले तसेच पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली.


  • -

मविप्रच्या जनता विद्यालय लहवित चा सुवर्ण महोत्सव समारंभ उत्साहात …

Category : social_projects

मविप्र संचलित जनता विद्यालय लहवित चा सुवर्ण महोत्सव सोमवार दि.२५ फेब्रुवारी रोजी उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून संस्थेच्या सरचिटणीस श्रीमती निलीमाताई पवार ,उपसभापती राघो नाना अहिरे,चिटणीस डॉ.सुनिल ढिकले  उपस्थित होते. व्यासपीठावर संचालक भाऊसाहेब खताळे, प्रल्हाद गडाख, सचिन पिंगळे, रामकृष्ण महाराज लहवितकर, अॅड. एन.जी.गायकवाड, मुख्याध्यापक एस.डी.शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सभापती माणिकराव बोरस्ते होते तसेच प्रमुख व्याख्याते म्हणून दै.सकाळ चे कार्यकारी संपादक श्रीमंत माने उपस्थित होते.

यावेळी बोलतांना श्रीमंत माने यांनी ‘ विद्यार्थ्यांनी उच्चशिक्षण घेऊन नोकरी मिळविण्याच्या मागे न लागता आधुनिक पद्धतीने शेती किंवा व्यवसाय केला पाहिजे. कारण आधुनिक तंत्रज्ञानामुळे नोकऱ्यांच्या संधी दिवसेंदिवस कमी होत चाललेल्या आहे. तसेच शेतीला पूरक असा जोडधंदा म्हणून शेतीपूरक व्यवसाय करावा असेही त्यांनी यावेळी बोलतांना सांगितले.

सरचिटणीस श्रीमती निलीमाताई पवार यांनी आपल्या मनोगतात ‘ संस्थेच्या व शाळेच्या विकासासाठी व गुणवत्तेसाठी विद्यार्थी,शिक्षक व पालक यांनी एकत्रित सहकार्य करावे असे सांगितले.

सभापती माणिकराव बोरस्ते यांनी सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त उपस्थित सर्व सभासद,विद्यार्थी,पालक व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.जेष्ठ सभासद व शालेय व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष डॉ.रामकृष्ण महाराज लहवितकर व अॅॅड.एन.जी.गायकवाड यांनी शाळा स्थापनेचा इतिहास सांगतांना जुन्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात कार्यक्रमाचे निमंत्रक व नाशिक ग्रामीण चे संचालक सचिन पिंगळे यांनी शाळेसाठी योगदान दिलेल्या कर्मवीरांच्या व गावातील आजी-माजी सभासदांच्या प्रति आदरभाव व्यक्त करीत त्यांच्याप्रती ऋण व्यक्त केले.

यावेळी ‘ सुवर्णपर्व ह्या स्मरणिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.सुत्रसंचलन श्रीमती ए.डी.लांडे व एस.जी.थेटे यांनी तर आभार आर.व्ही.निकम यांनी मानले. महोत्सवाची सांगता उद्या दि.२६ फेब्रुवारी रोजी हिवरेबाजार चे सरपंच व महाराष्ट्र शासनाच्या आदर्श गाव संकल्पनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांच्या उपस्थितीत होईल.


  • -

मविप्र संस्थेतर्फे शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूंचा सत्कार

Category : social_projects

महाराष्ट्र शासनाच्या वतीने नुकतेच शिवछत्रपती पुरस्कार प्रदान करण्यात आले.यात जिल्ह्यातील रोशनी अशोक मुर्तडक, मोनिका आथरे, अक्षय देशमुख, राजेंद्र सोनार, पूजा जाधव, संजय होळकर हे सहाही पुरस्कारार्थी मविप्र संस्थेचे आजी-माजी खेळाडू, शिक्षक असल्यामुळे मविप्र संस्थेच्या वतीने खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेच्या सरचिटणीस श्रीमती निलीमाताई पवार, सभापती माणिकराव बोरस्ते चिटणीस डॉ. सुनिल ढिकले, उपसभापती राघोनाना अहिरे, संचालक नाना महाले, रायभान काळे, उत्तमबाबा भालेराव, डॉ.विश्राम निकम, डॉ.जयंत पवार, डॉ.प्रशांत देवरे, दत्तात्रय पाटील, अशोक पवार, प्रल्हाद गडाख, प्रा.नानासाहेब दाते, गुलाब भामरे, सौ.नंदा सोनवणे, शिक्षणाधिकारी डॉ. डी.डी. काजळे, डॉ.आर.डी.दरेकर, प्रा.एस.के.शिंदे, सी.डी.शिंदे, डॉ.एन.एस. पाटील उपस्थित होते.


  • -

के टी एच एम प्रिंटींग टेक्नोलॉजी च्या विद्यार्थ्यांचा दिल्ली येथे अभ्यास दौरा …

Category : social_projects

के टी एच एम महाविद्यालयाच्या  प्रिंटींग टेक्नोलॉजी विभागातील प्रथम,द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांच्या अभ्यास दौऱ्याचे आयोजन नवी दिल्ली येथे करण्यात आले होते.या अभ्यासदौऱ्यात विद्यार्थ्यांनी चौथ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रिंटींग प्रदर्शनाला भेट दिली. या जागतिक प्रदर्शनात नवनवीन प्रिंटींग मशिन्स,डिजिटल मशिन्स,पॅकेजिंग मशीन्स ठेवण्यात आले होते.यावेळी विद्यार्थ्यांना थेट प्रिंटींग प्रात्यक्षिकही पहावयास मिळाले.या सोबतच संसद भवन,वाघा बॉर्डर येथेही भेट दिली.यावेळी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी,खा.सुप्रिया सुळे,खा.शत्रुघ्न सिन्हा यांचीही भेट घेतली.यासाठी खा.हेमंत गोडसे यांचे सहकार्य मिळाले. या अभ्यासदौऱ्यात विभागप्रमुख प्रा.सागर पेखळे,प्रा.आकाश कहांंडळ,प्रा.राहुल पगारे,प्रा.सचिन सासणे,प्रा.राहुल निकम यांचेसह ५५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.


  • -

सोशल चॅलेंज परिसंवाद

Category : social_projects

मराठा विद्या प्रसारक समाज संचलित समाजकार्य महाविद्यालयात सोशल चॅलेंज 2019 या थीम अंतर्गत एक दिवसीय परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या परिसंवाद प्रसंगी उद्घाटन कार्यक्रमात विचारमंचावर पाणी फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री सत्यजित भटकळ, म वि प्र समाजाचे संचालक सचिन पिंगळे, डॉ प्रशांत देवरे, निवृत्त प्राध्यापक व पाणी तज्ञ श्री अशोक सोनवणे, समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विलास देशमुख, प्रा. प्रतिमा पवार उपस्थित होते.

सर्वप्रथम दीपप्रज्वलनाने परिसंवादाचे उद्घाटन करण्यात आले. पाणी फाउंडेशन चे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री सत्यजित भटकळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, यावेळी श्री भटकळ यांनी सत्यमेव जयते पासूनचा पाणी फाउंडेशन पर्यंतचा प्रवास सांगितला. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा, स्पर्धेचे नियम आणि मनसंधरणातून जलसंधारण हे ब्रीद घेऊन कार्याची केलेली सुरुवात सांगितली. प्रशिक्षण, वैज्ञानिक दृष्टिकोन, लोकांच्या सहभागातून पाणी फाउंडेशन कॅटॅलिस्ट ची भूमिका करते असेही त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनात सांगितले. 24 जिल्हे, 75 तालुके व चार हजार गावांपर्यंत पोहोचून लोकांना सहभागी करून घेण्याचा यशस्वी आलेख समजावून विद्यार्थ्यांनाही सहभागी होण्याचे आवाहन माननीय श्री. सत्यजित भटकळ यांनी केले. परिसंवादाच्या उद्घाटन कार्यक्रमात प्रमुख अतिथी व मराठा विद्या प्रसारक समाजाचे संचालक मा. श्री. सचिन पिंगळे यांनी समाजकार्य महाविद्यालयाचे अभिनंदन केले व सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी समाजकार्य महाविद्यालयाची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन केले. या परिसंवादा च्याउद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष व मराठा विद्या प्रसारक समाजाचे संचालक डॉ.प्रशांत देवरे यांनी लोकांमध्ये एकजूट असेल तर कोणतेही कार्य थांबणार नाही आणि पाणी प्रश्नांवर काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था व शासन यांच्या विषयी मार्गदर्शन केले.

प्रथम सत्रात निवृत्त प्राध्यापक व पाणी तज्ञ अशोक सोनवणे यांनी भारतातील जलसंवर्धनाची पार्श्वभूमी व सद्यस्थिती विद्यार्थ्यांसमोर मांडली. त्यासोबत पाणी व्यवस्थापन पाण्याचे नियोजन कसे करावे हे सांगितले. राळेगणसिद्धी, हिवरेबाजार या गावांची लोकसहभागातून जलव्यवस्थापन केल्या बद्दल मार्गदर्शन ही त्यांनी केले.

द्वितीय सत्रात समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थी अक्षय बोंबले व काजल थोरात, नीलम मोजाड, पाटील गौरव यांनी जलनीती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच जलसाक्षरता व व्यवस्थापन या विषयावरील शोधनिबंध सादर केले.
द्वितीय सत्रात सॅमसोनाईट साऊथ एशिया प्रा लि चे सहाय्यक संचालक मिलिंद वैद्य यांनी इगतपुरी तालुक्यातील 11 गावातील जलसंवर्धनाची केस स्टडी सादर केली. सॅमसोनाईट ची कार्यपद्धती सांगितली प्रामुख्याने पूर्व सर्वेक्षण, कार्याची पद्धती, चालू करतो पाठपुरावा रणनीती काम झाल्यानंतर चा आढावा कसा घेतला गेला व त्यातून आठ धरणे व तीन विहिरी बांधले तसेच चार लाखांच्या पुढे इगतपुरी परिसरात वृक्षारोपण केले. याचीही विद्यार्थ्यांसमोर मांडणी केली. तसेच बॉस इंडिया फाउंडेशन, बंगलोर येथील क्षेत्र प्रकल्प संचालक सुशांत राऊत यांनी जलयुक्त शिवार अभियान व पाच गावातील केलेले कार्य विद्यार्थ्यांच्या समोर केस स्टडी च्या रूपाने सादर केले. त्यामध्ये लक्ष्मण पाडा, पहिने, सामुंडे, वाडीपाडा या गावांचे जलसंवर्धनातून , शेती व पशुसंवर्धन भाजीपाला लागवड करून त्यांना फायदा झाला. दोनशे कुटुंबांचा सहभाग किती महत्त्वाचा होता हे देखील श्री राऊत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनातून सांगितले. तसेच या गावांवर आधारित चित्रफितही दाखविण्यात आली.

समारोप सत्रात प्रा. चंद्रप्रभा निकम यांनी परिसंवादाचे अहवाल वाचन केले. प्रा डॉ घनश्याम जगताप यांनी आभार व्यक्त केले.सोशल चॅलेंज 2019 च्या एक दिवशीय परिसंवादाचे प्रास्ताविक प्रा. प्रतिमा पवार यांनी केले,स्वागतपर मनोगत समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विलास देशमुख यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.सोनल बैरागी, पाहुण्याचा परिचय प्रा. प्रतिमा पगार, प्रा मनीषा शुक्ल यांनी केला तसेच आभार प्रदर्शन प्रा डॉ घनश्याम जगताप यांनी केले. या वेळी विविध सामाजिक संस्था प्रतिनिधी, विद्यार्थी व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थीत होते.


  • -

राष्ट्रीय स्तरावरील इन्स्पायर अवाॅर्ड विज्ञान प्रदर्शनासाठी मराठा हायस्कूलच्या ऐश्वर्या गुंजाळची निवड.

Category : social_projects

केंद्र शासन, महाराष्ट्र शासन, विद्या प्राधिकरण पुणे,विज्ञान शिक्षण संस्था नागपूर व नानासाहेब महाडिक अभियांत्रिकी महाविद्यालय पेठ नाका सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ८ व्या राज्य स्तरीय इन्सपायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शनात मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या नाशिक येथील मराठा हायस्कूलची विद्यार्थिनी ऐश्वर्या गुंजाळ हिची राष्ट्रीय स्तरावरील दिल्ली येथे होणाऱ्या इन्स्पायर अवाॅर्ड  विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली.

              ऐश्वर्या हिने दैनंदिन जीवनातील एक मोठी समस्या ‘ वाढते प्रदुषण ‘  या विषयावर  एअर प्युरिफायर ही प्रतिकृती तयार केली होती. प्रदर्शनात तिने अतिशय उत्तम सादरीकरण करून त्या उपकरणाची गरज स्पष्ट केली. त्यामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान वापरून ही समस्या कायमचीच दूर होऊ शकते हे तिने  खात्रीशीर पटवून दिले. तिच्या या साध्या व सोप्या तंत्रज्ञानाचा सामान्य लोकांना सुद्धा उपयोग होईल. यासाठी परीक्षकांनी तिची राष्ट्रीय स्तरावर निवड केली. तिचा सत्कार मविप्रचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रा.संजय शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.  तिला विज्ञान शिक्षक हेमंत पाटील , ज्ञानेश्वर शिंदे , संगिता आहेर,कलाशिक्षक जगदीश डिंगे व इतर सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

            तिच्या या यशाबद्दल मविप्र समाज संस्थेचे अध्यक्ष डाॅ. तुषार शेवाळे,सरचिटणीस निलिमाताई पवार,चिटणीस डाॅ. सुनील ढिकले, सभापती माणिकराव बोरस्ते,उपसभापती राघो नाना आहिरे,नाशिक शहर तालुका संचालक नानासाहेब महाले,नाशिक ग्रामीण तालुका संचालक सचिन पिंगळे व सर्व संचालक मंडळ,मविप्र समाज संस्थेचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रा.संजय शिंदे,विद्यालयाचे मुख्याध्यापक अरुण पवार, उपमुख्याध्यापक एस्.डी.शिंदे,पर्यवेक्षक एन.एफ.बोराडे, एस्.बी.सोमवंशी, विजय म्हस्के, सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

फोटो  – नाशिक येथील मराठा हायस्कूल मध्ये राज्य स्तरावरुन राष्ट्रीय स्तरावर इन्स्पायर अवार्ड विज्ञान प्रदर्शनासाठी ऐश्वर्या गुंजाळ हिची निवड झाल्याबद्दल सत्कार करतांना मविप्र समाज संस्थेचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रा.संजय शिंदे,समवेत विद्यालयाचे मुख्याध्यापक अरुण पवार,उपमुख्याध्यापक एस.डी.शिंदे,पर्यवेक्षक एन.एफ.बोराडे,एस.बी.सोमवंशी,विजय म्हस्के,यशस्वी विद्यार्थीनी ऐश्वर्या गुंजाळ,मार्गदर्शक शिक्षक आदी