बहुजन हिताय बहुजन सुखाय

मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक.

Maratha Vidya Prasarak Samaj, Nashik.

Central Office, Shivaji Nagar, Gangapur Road, Nashik-422002, Maharashtra, India.

Category Archives: social_projects

  • -

नैसर्गिक सौंदर्य व पर्यावरणातील बदल विचारात घेऊन आधुनिक लॅण्डस्केपिंग करणे गरजेचे – आर्किटेकट अमृता पवार

Category : social_projects

के. टी. एच. एम. कॉलेज वाणिज्य प्रयोगशाळा व संशोधन केंद्रातर्फे आयोजित विचारमंथन व्याख्यानमालेसाठी मार्गदर्शक म्हणून जि. प. सदस्या आर्किटेकट अमृता पवार उपस्थित होत्या, अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड होते. अमृता पवार यांनी यावेळी मार्गदर्शन करतांना ‘ लॅण्डस्केपिंग हे वातावरणातील संतुलन राखण्यासाठी पूर्वीपासून जगभर केले जात असल्याचे सांगून मोठं-मोठ्या दगडांचे पिरॅमिड्स,चायनावॉल त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील विहिरी,राजस्थानमधल्या बावडीजोहर पूजा पाठ करण्यासाठी नदीकाठचे घाट हे सर्व लॅण्डस्केपिंग चे प्रकार असून मोगलांच्या काळापासून आनंद मिळविण्यासाठी लॅण्डस्केपिंगची सुरुवात झाली.भारतात प्रामुख्याने समाजाला उपयोगी पडेल असे लॅण्डस्केपिंग केले जाते.भारतात आता शहरांमध्ये बऱ्याचशा इमारतींमध्ये भाजीपाला जीवनउपयोगी वनस्पतींची लागवड करून लॅण्डस्केपिंग सुरु केले आहे.

भारतात हल्ली अनेक खेड्यांमध्ये वाघ, बिबटे, शेतजमींनीमध्ये प्रवेश करतात, याचे कारण आपण त्यांच्या प्रदेशात अतिक्रमण केले आहे. चीनमध्ये सांडपाणी व कचरा यावर प्रक्रिया करून वातावरण पूरक असे लॅण्डस्केपिंग करण्यात आलेले आहे. लॅण्डस्केपिंग चा मोठ्या प्रमाणावर पर्यटनस्थळ म्हणून लोक कसा वापर करतात हे त्यांनी स्लाईड प्रेझेन्टेशन द्वारे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक डॉ.श्रीकांत जाधव यांनी केले.सुत्रसंचलन प्रा.डी.जी.पोटे यांनी तर आभार विभागप्रमुख प्रा.डी.आर.पताडे यांनी मानले.

 


  • -

मविप्र प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या अंतिम फेरी वकृत्व स्पर्धा संपन्न ….

Category : social_projects

प्राथमिक गटात गौरी खैरणार,माध्यमिक (इ.५ वी ते ७ वी ) गटात प्रज्वल सूर्यवंशी व  कुलदीप वाघ प्रथम  (इ.८ वी ते ९ वी) गटात  मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील वकृत्व स्पर्धा प्राथमिक फेरी शालेय पातळीवर,द्वितीय फेरी १५ केंद्रांवर व या स्पर्धेची अंतिम फेरी आज संस्थेच्या रावसाहेब थोरात संपन्न झाली,यावेळी प्रमुख अतिथी म्हणुन संचालक सचिन पिंगळे उपस्थित होते.व्यासपीठावर शिक्षणाधिकारी सी.डी.शिंदे,परीक्षक प्रा.प्रकाश वामने,डॉ.श्रीमती उमा जाधव,डॉ.एस.आर.भालेराव. प्रा.मनिषा शुक्ल, मराठा हायस्कूल चे मुख्याध्यापक अरुण पवार उपस्थित होते.

यावेळी बोलतांना संचालक सचिन पिंगळे यांनी ‘ अभ्यासासोबतच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा,विद्यार्थी सर्वगुणसंपन्न व्हावा या संकल्पनेतून मविप्र संस्था अनेक उपक्रम राबविते. प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या वक्तृत्व स्पर्धांची सुरुवात हि विद्यार्थ्यांची वक्तृत्व कौशल्ये वाढावीत व तो सर्वांगाने परिपूर्ण व्हावा या उद्देशाने केलेली असून या स्पर्धेतून भविष्यात चांगले वक्ते निर्माण होतील अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच शरदराव पवार,विलासराव देशमुख,बाळासाहेब ठाकरे,आर.आर.पाटील,एन.डी.पाटील यांसारखे मोठे नेते हे वक्तृत्वाच्या जोरावर राजकारणात यशस्वी ठरल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

प्रास्ताविकात शिक्षणाधिकारी सी.डी.शिंदे यांनी ‘ संस्थेच्या सरचिटणीस श्रीमती निलीमाताई पवार यांच्या संकल्पनेतून सुरु केलेल्या प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या वक्तृत्व स्पर्धेतून चांगले व प्रभावी वक्ते तयार होतील असा विश्वास व्यक्त करतांना वक्तृत्व स्पर्धेच्या वाटचालीचा आढावा घेतला.

इ. ३ री ते ४ थी साठी बलसागर भारत होवो,मित्र कसा असावा ?,गुरु देवोभव !,शाळाच नसत्या तर,आई मला खेळायला जाऊ दे ना हे विषय देण्यात आले होते. इयत्ता ५ वी ते ७ वी साठी गाऊ त्यांना आरती,शिक्षण : यशस्वी जगण्याचा मूलमंत्र,अनंत अमुची धेय्यासक्ती,कर्मवीर रावसाहेब थोरात,स्री : काल.आज आणि उद्या तसेच इ.८ वी ते ९ वी साठी यशोगाथा मविप्र ची,ग्रंथ उजळीतो मार्ग आपुला,हरवत चाललंय गावच गावपण,जीवन त्यांना कळले हो! , साहित्यिक पु.ल.देशपांडे हे विषय ठेवण्यात आले होते. परीक्षक प्रा.प्रकाश वामने यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना वक्तृत्व सादर करतांना आवाजातील चढ-उतारावर लक्ष द्यावे असे सांगून विद्यार्थ्यांनी चांगले वक्ते होण्यासाठी पुस्तकांचे वाचन व मनन करावे असे सांगितले.

यावेळी द्वितीय फेरीत प्रथम व द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या वक्तृत्वाचे सादरीकरण करीत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. इ. ३ री ते ४ थी साठी परीक्षक म्हणून सविता जाधव,.सुरेखा बोऱ्हाडे यांनी,माध्यमिक विभागाचे परीक्षक म्हणून  (५ वी ते ७ वी ) डॉ.एस.आर.भालेराव व प्रा.मनीषा शुक्ल  यांनी तर ८ वी व ९ वी गटासाठी  डॉ.श्रीमती उमा जाधव ,प्रकाश वामने यांनी यांनी काम बघितले. स्पर्धेचे नियम डॉ.डी.पी.पवार यांनी समजावून सांगितले.सुत्रसंचलन सुवर्णा गायकवाड यांनी केले.

निकाल :

प्राथमिक विभाग (री व ४ थी )

१) गौरी मधुकर खैरणार (अभिनव बालविकास मंदिर,उत्तमनगर,सिडको )

२) समृद्धी गोकुळ बोडके (बालशिक्षण मंदिर गोरेराम लेन,शाळा नं.२ )

3) अपेक्षा दिगंबर खैरणार (अभिनव बालविकास मंदिर,गंगापूर रोड,नाशिक )

उत्तेजनार्थ

१) श्रावणी धनंजय सोनवणे (आदर्श इंग्लिश मिडीयम स्कूल,सटाणा)

२) आदिती कांतीराम गिते (अभिनव बालविकास मंदिर,सायखेडा )

3) स्नेहल सुरेश पवार (आदर्श इंग्लिश मिडीयम स्कूल,सिन्नर )

 

माध्यमिक विभाग (इ.५ वी ते ७ वी )

१) प्रज्वल योगेश सूर्यवंशी (मराठा हायस्कूल, नाशिक )

२) सर्वेश प्रकाश कांगणे (जनता विद्यालय, मुखेड )

3)  प्रिया अरुण खैरनार (जिजामाता गर्ल्स हायस्कूल, सटाणा )

उत्तेजनार्थ

१) समृद्धी विजय बनकर (मराठा हायस्कूल, नाशिक )

२)  खुशबू कृष्णा निकम (जनता विद्यालय, आघार )

3) आदित्य केशव गायकवाड (आदर्श इंग्लिश मिडीयम स्कूल, दिंडोरी )

 

माध्यमिक – इयत्ता ८ वी व ९ वी 

१) कुलदीप धनराज वाघ (जनता विद्यालय, सातपूर )

२)  दुर्गा हिरामण बेंडकोळी (जनता विद्यालय, धोंडेगाव ) व

     राजश्री कल्याण पटेल (न्यू मराठा हायस्कूल, नाशिक )

3) हर्षाली सुनिल कापडणीस (जिजामाता गर्ल्स हायस्कूल, सटाणा )

उत्तेजनार्थ

१) हरिष शिवाजी दांडेकर  (जनता विद्यालय, वडनेरभैरव )

२) प्रिया मारुती काळुंगे  (जनता विद्यालय, सोनांबे )

3) प्राची महेंद्र पाटील (जनता इंग्लिश स्कूल, जायखेडा )


  • -

विज्ञानाची बांधणी हि त्रिसुत्रावर आधारित – डॉ. आनंद करंदीकर

Category : social_projects

विज्ञान हे अनुभवांना प्रमाण मानते, जे अनुभवातून आपल्या मांडणीतून विसंगत दिसते ते वैज्ञानिकांनी मान्य करायला आहे.विज्ञानात अंतिम सत्य नाही तसेच विज्ञान हे तात्पुरते वैज्ञानिक सत्य असले तरी ते अंतिम सत्य नाही.विज्ञानाने अनपेक्षित व आश्चर्यकारक भाकीत केले पाहिजे,ते नाविन्यपूर्ण असावे ह्या त्रिसूत्रीवर विज्ञानाची बांधणी आधारित असल्याचे प्रतिपादन डॉ.आनंद करंदीकर यांनी केले. ते के टी एच एम महाविद्यालय पत्रकारिता व जनसंज्ञापन विभाग आयोजित दहाव्या डॉ वसंतराव पवार व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफतांना रावसाहेब थोरात सभागृहात बोलत होते. यावेळी संचालक सचिन पिंगळे,दत्तात्रय पाटील,शिक्षणाधिकारी सी.डी.शिंदे, डॉ.आर.डी.दरेकर, अॅड एकनाथ पगार, उपप्राचार्य डॉ.एम.बी.मत्सागर, डॉ.जे.एस.आहेर, डॉ. श्रीमती बी.डी. पाटील, प्रा. डी.आर.पताडे, समन्वयक प्रा.प्राची पिसोळकर उपस्थित होते.

विज्ञानाचा विकास आपल्या देशात हवा तसा होत नाही हे दुर्दैव आहे. देशात कार्यरत असणाऱ्या विविध संस्थामध्ये कार्यरत असलेल्या वैज्ञानिकांच्या हातून जागतिक स्तरावरील शोधाची निर्मिती न झाल्यामुळे आपल्या वैज्ञानिकांना नोबेल पारितोषिकापासूनही वंचित राहावे लागले आहे मात्र आठव्या आणि नवव्या शतकात भारतामध्ये वास्तुशास्र, गुफाशिल्पे यांची जी निर्मिती झाली ती अप्रतिम असून त्या शिल्पकारांना विज्ञानाचेही ज्ञान होते असे म्हणता येईल. दिल्लीतील जंतर-मंतर दुर्बिण त्याचप्रमाणे भारताचा जगाच्या तुलनेत एकूण व्यापारात भारतीयांचा ५० टक्के वाटा होता. भारतीय खगोलशास्त्रज्ञानी ग्रह ताऱ्यांचे निरीक्षण करून तांत्रिक कौशल्य पुढे नेले.आपल्या देशातील संशोधक हे अमेरिकेत जाऊन संशोधनात सहभागी होतात, त्यामुळे अमेरिकेची तंत्रवैद्यानिक प्रगती हि जगाच्या तुलनेत अधिक आहे अशी देखील खंत डॉ. करंदीकर यांनी यावेळी व्यक्त केली.

  सूत्रसंचलन कु.प्रसाद देशमुख याने तर आभार प्रा. योगेशकुमार होले यांनी मानले.  प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. श्रीमती संगिता पानगव्हाणे यांनी करून दिला. यावेळी प्रा.गोकुळ सानप उपस्थित होते. उद्या दिनांक ३१ जानेवारी रोजी विज्ञान लेखिका श्रीमती माधुरी शानबाग या  ‘ विज्ञानाची खुणावणारी क्षितिजे ‘या विषयावर अखेरचे पुष्प गुंफतील.


  • -

डॉ.वसंतराव पवार व्याख्यानमालेचा समारोप…

Category : social_projects

विज्ञानाचा सहाय्यक म्हणून वापर करा – विज्ञान लेखिका माधुरी शानभाग …

वैज्ञानिक शास्रातील विषयांमध्ये दिवसेंदिवस वैद्यानिक दृष्टीकोनातून संशोधन होत आहे.येणाऱ्या काही शतकांमध्ये याचे प्रमाण वाढणार आहे. हि होणारी वैज्ञानिक संशोधनाची क्रांती सर्व जगासाठी हितकारक ठरणार असे म्हंटले तरी देखील विज्ञानाला आपण सहाय्यक म्हणूनच वापरले पाहिजेअसे प्रतिपादन विज्ञान लेखिका माधुरी शानभाग यांनी केले त्या के टी एच एम महाविद्यालय पत्रकारिता व जनसंज्ञापन विभाग आयोजित दहाव्या डॉ वसंतराव पवार व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प गुंफतांना रावसाहेब थोरात सभागृहात बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संचालक डॉ.प्रशांत देवरे होते.यावेळी शिक्षणाधिकारी डॉ. डी. डी. काजळे, सी. डी. शिंदे, डॉ. आर. डी. दरेकर, उपप्राचार्य. डॉ. एम. बी. मत्सागर, डॉ. श्रीमती. बी. डी.पाटील, डॉ. बी. जे. भंडारे, प्रा. हेमंत पाटील, समन्वयक प्रा.प्राची पिसोळकर उपस्थित होते.

      तंत्रज्ञानात होणाऱ्या विविध क्रांती मग ती मोबाईल, इंटरनेट, सौरउर्जा, सेन्सरवर गाडी चालवणे यामध्ये विकास होत आहे. संशोधनातही नवीन शोधायचे व जे आहे त्यातही बदल करायचे. संशोधकांनी केलेल्या संशोधनामध्ये दरवर्षी ६६ टक्के दराने माहितीची वाढ होत आहे. विसाव्या शतकामध्ये पदार्थविज्ञान शाखेमध्ये संगणक, रसायन, जीवशास्र हि सर्व शास्रे एकमेकांमध्ये मिसळून गेली.  आता २१ व्या शतकात नॅनो तंत्रज्ञानाचे महत्वं वाढत असून या तंत्रज्ञानासाठी खर्चिक प्रयोगशाळा, उपग्रह प्रक्षेपण, हायड्रोजन पासून मिळवायची उर्जा, सौरउर्जा, अणुच्या एकत्र येण्याने होणारी उर्जा यातही मोठी क्रांती घडू शकते. ग्रीन केमिस्ट्री यामुळे पर्यावरणाची जपणूकही करता येते. वैद्यकशास्रात मानवाच्या क्षमता वाढविण्यासाठी तंत्रज्ञानांची मोठी मदत होत आहे. नवनवीन संशोधनामध्ये प्राणीशास्त्र, समाजशास्र, मानसशास्र, शिक्षणकला आदींमध्येही मोठ्या प्रमाणामध्ये संशोधनात्मक प्रगती होत असून ती विज्ञानाची खुणावणारी क्षितिजे असल्याचेहि त्यांनी अखेरीस सांगितले.

   अध्यक्षीय मनोगतात संचालक डॉ. प्रशांत देवरे यांनी ‘ डॉ.वसंतराव पवार व्याख्यानमालेच्या माध्यमातून गेली १० वर्ष समाजप्रबोधनाचे काम होत आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना विविध विषयांवर होणारे विचारमंथन भविष्यासाठी प्रेरणादायी ठरेल. डॉ. वसंतराव पवार यांच्या प्रेरणेने सुरु झालेली व्याख्यानमाला सर्वांसाठी अभ्यासपूर्ण ठरेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

       सूत्रसंचलन  प्रा. योगेशकुमार होले यांनी  तर आभार प्रा. विशाखा ठाकरे यांनी मानले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. श्रीमती संगिता पानगव्हाणे यांनी करून दिला. यावेळी प्रा. गोकुळ सानप उपस्थित होते.


  • -

के टी एच एम महाविद्यालयाचे धोडप किल्ला येथे गिर्यारोहण शिबीर उत्साहात…

Category : social_projects

      सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व मविप्र संचलित के टी एच एम महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास मंडळ आयोजित जिल्हास्तरीय गिर्यारोहण शिबीर ३० जानेवारी रोजी चांदवड मधील धोडप किल्ला येथे आयोजित केले होते. शिबिराचे उद्घाटन प्राचार्य डॉ.व्ही.बी.गायकवाड यांनी केले. यावेळी विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. गणेश मोगल, प्रा.वाय.के.चौधरी, प्रा.कांचन बागुल, डॉ. एन. डी. गायाकवाड व विद्यार्थी उपस्थित होते. चांदवड व कळवण तालुक्यातील सिमेवर असलेला व अजिंठा आणि सातमाळा गिरिदुर्ग साखळीतील सर्वात उंच आणि बलदंड किल्ला म्हणजे धोडप किल्ला होय. शिवलिंगासारख्या आकाराचा माथा असलेला धोडप या आकारामुळे दूरवरून स्पष्टपणे ओळखू येतो. किल्ल्याकडे जातांना असलेल्या विसृत पठारावर अनेक ज्योती, मंदिरे, पुष्करणी, मूर्ती व कबरी आढळतात.
      छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या धोडप किल्ल्यावर विद्यार्थ्यांनी मुख्य परिसराची स्वच्छता करून गडावरील मार्गातील पडलेला कचरा व प्लास्टिक जमा केला. विद्यर्थ्यांना यावेळी डॉ. एन. डी. गायकवाड यांनी किल्ल्याविषयी सविस्तर माहिती सांगितली. विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. गणेश मोगल यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाविषयी मार्गदर्शन केले तसेच गड व किल्ले संवर्धन करणे हि काळाची गरज असल्याचे सांगितले.
      गड परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर गडाच्या पायथ्याशी असलेल्या हट्टी या गावातील अडव्हेन्चर क्लबमध्ये विद्यार्थ्यांनी व्यवस्थापक मनोज परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली साहस शिबिरांतर्गत विविध उपक्रम केले. या कार्यशाळेसाठी विकास कुलकर्णी, माधुरी वाघ, श्वेता राऊत, श्याम पवार यांनी परिश्रम घेतले.


  • -

डॉ वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात मुख दंत शल्य चिकित्सकांची राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न …

Category : social_projects

६ वी राज्यस्तरीय मुख दंत शल्य चिकित्सकांच्या प्री कॉन्फरन्स कार्यशाळेचे आयोजन डॉ वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय दंतरोग विभागातर्फे करण्यात आले होते.कार्यशाळेचे उद्घाटन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे रजिस्टार डॉ कालिदास चव्हाण यांच्याहस्ते करण्यात आले.प्रमुख अतिथी म्हणून अधिष्ठाता डॉ मृणाल पाटील उपस्थित होत्या.

 यावेळी डॉ चव्हाण यांनी ‘ आधुनिक उपचार पद्धतीचे ज्ञान व्यावसायिक दंत मुख शल्य चिकित्सकांना अशा कार्यशाळामुळे निश्चितच मिळते व त्याचा फायदा रुग्णांपर्यंत पोहोचतो असे मत व्यक्त केले. डॉ मृणाल पाटील यांनी आपल्या मनोगतात ‘ मौखिक आरोग्य हे शरीराच्या सर्वांगीण आरोग्याशी निघडीत असून त्याशिवाय शरीराची निरोगीपणाची संकल्पना पूर्ण होऊ शकत नाही असे सांगितले.

    दंतरोग विभागप्रमुख व डॉ चंद्रशेखर नामपूरकर यांनी मौखिक आरोग्य सप्ताहनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाची माहिती दिली.डॉ.मनिषा मराठे-पगार यांनी कार्यशाळेविषयी सविस्तर माहिती दिली.प्री कॉन्फरन्स कार्यशाळेसाठी कॉन्फरन्स चेअरमन डॉ.सौ.सिमा भूसरेड्डी,डॉ.प्रणव आशर,डॉ.अनुज दधिच,डॉ.अजय भूसरेड्डी,डॉ.दिलीप सोनवणे उपस्थित होते. सुत्रसंचलन डॉ.रचना चिंधडे यांनी तर आभार डॉ.सचिन दहिवेलकर यांनी केले.सदर कार्यशाळेसाठी राज्यभरातून १८० मुख दंत चिकित्सक उपस्थित होते.

  • -

चौथी औद्योगिक क्रांती ही जैव तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान व नॅनो टेक्नोलॅाजीवर आधारित असेल – डॉ.विनायक गोविलकर

Category : social_projects

के.टी.एच.एम. महाविद्यालयाच्या वाणिज्य प्रयोगशाळा व संशोधन केंद्रातर्फे आयोजित विचारमंथन व्याख्यानमालेत चौथी औद्योगिक क्रांती या विषयावर दुसरे पुष्प डॉ.गोविलकरांनी गुंफले,यावेळी बोलतांना त्यांनी ‘ पहिली औद्योगिक क्रांती १८ व्या शतकात (१७८४ ते १९ वे शतक) सुरु झाली, त्यावेळेस पाण्याचा व वाफेचा उर्जा म्हणून वापर करण्यास सुरवात झाली, त्या काळात वस्त्र उद्योगास चालना मिळाली, दुसरी औद्योगीक क्रांती (१८७० ते १९१४) या काळात झाली. त्यावेळेस कोळश्याचा विजेसाठी वापर केला जाऊ लागला व त्या औद्योगिक क्रांतीत वाफ व वीज यांचा उर्जा म्हणून वापर करण्यास सुरवात झाली. तसेच त्या काळात लोखंड, ओईल व विजेच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. तिसरी औद्योगिक क्रांती १९८० नंतर सुरु झाली त्यात डिजिटल तेक्नोलोजीचा उदय झाला व इलेक्ट्रोनिक्सवर आधारित उद्योगांना चालना मिळाली. चौथी औद्योगिक क्रांती २०१६ पासून सुरु झाली असून ही औद्योगिक क्रांती जैव तंत्रज्ञान, नानो टेक्नोलोजी व कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर आधारित औद्योगिक क्रांती सुरु झाली. त्यामुळे आता माणूस मशीनला बुद्धिमत्ता वापरण्याइतपत सक्षम बनवू लागला. आता मशीन माणसाला मार्गदर्शन करते, मशीनला स्वताची बुद्धिमत्ता असल्याने माहिती मिळविणे, माहितीचे पृथकरण करणे आणि त्याच्या आधारावर निर्णय घेणे इत्यादी कामे करू लागल्याने माणसांची कामे यापुढे यंत्र करू लागतील. स्वयंचलित यंत्र, स्वयंचलित वाहने व यंत्रमानव यापुढे सर्व क्षेत्रात उदा. बँका,उद्योगधंदा, शेती उद्योग, वाहन उद्योग, शिक्षण क्षेत्रात इ. क्षेत्रात काम करताना दिसतील त्याचा परिणाम उत्पादन क्षमता वाढेल, उत्पादनाचा दर्जा वाढेल, उत्पादन अचूक व दोष विरहित होत जाईल. ग्राहकांना चांगली सेवा मिळेल, विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होतील. परंतु अकुशल कामे उदा. कारकुनी कामे, हिशोबाची कामे,कायद्याचा सल्ला देण्याची कामे ई. कामे यंत्रामार्फत केले जातील त्यामुळे रोजगार ५०% पेक्षा जास्तीने कमी होतील त्यामुळे पुढच्या पिढीने विज्ञान व तंत्रज्ञानावर आधारित कौशल्य प्राप्त करणे गरजेचे आहे अन्यथा त्यांना रोजगार मिळणे अशक्य होईल.व्याख्यानमालेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य.डॉ.व्ही.बी.गायकवाड होते. प्रमुख वक्त्यांचा परिचय प्रा.डॉ.श्रीकांत जाधव यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा.डी.जी.पोटे यांनी तर आभार विभागप्रमुख प्रा.डी.आर.पताडे यांनी मानले.


  • -

डॉ. पवार वैद्यकीय महाविद्यालयात मॉडेल व पोस्टर निर्मिती स्पर्धा

Category : social_projects

मॉडेल निर्मितीतून अवघड शिक्षण सुकर – डॉ. मृणाल पाटील 

वैद्यकीय शिक्षणात वर्गातील पुस्तकी अध्ययनात  सर्व पैलू उलगडत नाही , त्यामुळे पुस्तकांपलीकडे ज्ञानर्जन करतांना  जिवंत कृतीचे मॉडेल व पोस्टर तयार करून विद्यार्थ्यांना अवघड शिक्षण सोप्या पद्धतीने समजून घेता येईल , असे प्रतिपादन डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मृणाल पाटील यांनी व्यक्त केले.

आडगाव येथील मराठा विद्या प्रसारक समाजाच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण तंत्रज्ञान आणि  शरीरक्रिया शास्त्र  विभागाच्या वतीने आयोजित मॉडेल व पोस्टर निर्मिती स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी डॉ. मृणाल पाटील बोलत होत्या. कमी खर्चात, टाकाऊ पासून टिकावू आणि कमी उर्जेवर आधारित विकसित तंत्रज्ञानाचा वापर करत बनविलेले जिवंत प्रतिकृती आणि पोस्टर वैद्यकीय शिक्षणातील गोडी निश्चितच वाढवेल असा विश्वास व्यक्त करून वैद्यकीय शिक्षणात अश्या प्रकारचा प्रयोग प्रथमच मविप्रच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाच्या एमईटी सेल ने केला असल्याचे   शेवटी त्यांनी सांगितले.   प्रारंभी विभागप्रमुख डॉ. प्रदीप बर्डे यांनी प्रास्ताविक करून  मूत्राशयाचे काम , रक्तदाब नियंत्रणाचे काम , थॉयरॉईड ग्रंथीचे कार्यशैली या सारख्या  अवघड विषयांवर विद्यार्थ्यांनी  जीवंतप्रतिकृती व पोस्टर  सादर केले असून  अश्या स्पर्धेतून विद्यार्थ्यांमध्ये एकत्रित कामकाज , परस्पर सं वाद कौशल्य, सृजनशीलता  वाढीस वागून प्रशिक्षित डॉक्टर तयार होऊन उच्च दर्जाची आरोग्य सुविधा स्वस्त दरात  उपलब्ध होतील , असा विश्वास व्यक्त केला- याप्रसंगी डॉ. नीलिमा चाफेकर , जोत्स्ना कुलकर्णी,  डॉ. गौरी प्रधान ,  डॉ नीता गांगुर्डे, डॉ. गणेश घुगे आदी उपस्थित होते.   या स्पर्धेत डॉ. पवार वैद्यकीय महाविद्यालयासह  लातूर , अहमदनगर आदी ठिकाणच्या महाविद्यालयाचे विद्यार्थी  सहभागी झाले.  स्पर्धेतील विजेत्यांना अधिष्ठाता डॉ-  मृणाल पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले- स्पर्धा यशस्वीतेसाठी डॉ. वृषाली बस्ते , डॉ. सतीश वाघमारे, डॉ.  बी.व्ही. शिंदे  व फिजिओलॉजी विभाग कर्मचारी  प्रयत्नशील होते .

 आडगाव येथील मराठा विद्या प्रसारक समाजाच्या डॉ- वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण तंत्रज्ञान आणि शरीरक्रिया शास्त्र  विभागाच्या वतीने आयोजित मॉडेल व पोस्टर निर्मिती स्पर्धेत मॉडेल ची सहभागी विद्यार्थ्यांकडून  माहिती जाणून घेतांना अधिष्ठाता डॉ- मृणाल पाटील, डॉ – प्रदीप बर्डे , डॉ. गौरी प्रधान , डॉ . गणेश घुगे.


  • -

मविप्रच्या केबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या २४ विद्यार्थ्यांची इन्फोसिस मध्ये निवड…

Category : social_projects

मराठा विद्या प्रसारक समाज व सवित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या सयुंक्त विद्यमाने इन्फोसिस लिमिटेड या अग्रगण्य कंपनीचा कॅम्पस ड्राईव्ह मराठा विद्या प्रसारक समाजाच्या कर्मवीर अॅॅड  बाबूराव गणपतराव ठाकरे कॉलेज ऑफ इंजिनीरिंग येथे १९ व २० जानेवारीला संपन्न झाला.सदर कॅम्पस ड्राईव्हमध्ये केबीटी कॉलेज ऑफ इंजिनीरिंग मधील २४ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह इंजिनीरिंगच्या सर्व विभागासाठी आयोजित केलेला होता, इन्फोसिस कंपनीने निवड केलेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक ३ लाख ६० हजार रुपयांचे पॅकेज देण्यात आले आहे. कॅम्पस ड्राईव्ह साठी एच.आर.जसप्रीत.वालिया आणि इन्फोसिस मधल्या ११ सदस्यांनी सर्व व्यवस्थापन बघितले. नाशिक जिल्ह्यातील विविध महाविद्यालयामधून ७५० विद्यार्थ्यांनी ह्या कॅम्पस ड्राईव्हसाठी सहभाग घेतला, त्यामधून १५८ विद्यार्थ्यांना अंतिम फेरीत प्रवेश मिळाला. २० जानेवारी रोजी ११ सदस्यांच्या इन्फोसिस पॅनलने वैयक्तिक मुलाखती घेतल्या.  या अगोदर सॅप कोर्सेस च्या माध्यमातून १०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची प्लेसमेंट झाली असुन ते भारतातील नावाजलेल्या कंपन्यांमध्ये काम करीत आहेत.
या यशाबद्दल मविप्र सरचिटणीस श्रीमती नीलिमाताई पवार संस्थेचे अध्यक्ष डॉ.तुषार शेवाळे, सभापती माणिकराव बोरस्ते,उपसभापती राघोनाना आहिरे,चिटणीस डॉ.सुनील ढिकले व मविप्रचे सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.  प्लेसमेंट ड्राईव्ह च्या आयोजनासाठी संस्थेचे शिक्षणाधिकारी डॉ.नानासाहेब पाटील, शिक्षणाधिकारी डॉ.ज्ञानेश्वर काजळे, प्राचार्य नितीन देसले, ट्रैनिंग आणि प्लेसमेंट ऑफिसर विनीत देवरे यांनी वेळोवेळी सहकार्य केले.


  • -

तंत्रज्ञानाच्या मदतीने वाढवा तुमची स्मरणशक्ती – डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे संशोधन

Category : social_projects

अविष्कार स्पर्धेत पुलकित सिंग राज्यपातळीवर दुसरा 
महाराष्ट  आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वतीने विद्यापीठ पातळीवर झालेल्या अविष्कार संशोधन महोत्सवात नाशिकच्या डॉ- वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश प्राप्त केले असून यातील दोन विद्यार्थ्यांची राज्यपातळीवर निवड झाली तर पुलकित सिंग ह्या विद्यार्थांच्या संशोधन प्रकल्पाला राज्यपातळीवर दुसरा क्रमांक प्राप्त झाला असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ-मृणाल पाटील यांनी दिली-
         महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विदयापीठात वैद्यकीय संशोधनाला चालना व विद्यार्थ्यांना  प्रोत्साहन मिळावे, याकरिता विद्यापीठ पातळीवर अविष्कार संशोधन महोत्सवाचे आयोजन करण्यात येते, डॉ- वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालाटून यंदा सहा विद्यार्थांनी संशोधन प्रकल्प सादर केले होते- यात मुस्कान गाबा ,पुलकित सिंग  यांच्या प्रकल्पांची राज्यपातळीवर  गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठात झालेल्या राज्यस्तरीय अविष्कार संशोधन महोत्सवासाठी निवड झाली. गोंडवाना विद्यापीठात झालेल्या फेरीत डॉ-वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाचे पुलकित सिंग , मुस्कान गाबा  यांची  टॉप सिक्स मध्ये निवड झाली तर पुलकित सिंग च्या प्रकल्पाला राज्यपातळीवर व्दितीय  क्रमांक मिळाला आहे- अशी माहिती अधिष्ठाता डॉ- मृणाल पाटील यांनी दिली- या प्रकल्पांना मध्यवर्ती संशोधन प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ- प्रदीप बर्डे, मायक्रोबायोलॉजी विभागाच्या प्रमुख डॉ- नीता गांगुर्डे , फिजिओलॉजी विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ- सतीश वाघमारे यांचे मार्गदर्शन लाभले- या यशाबद्दल मविप्र सरचिटणीस श्रीमती नीलिमाताई पवार संस्थेचे अध्यक्ष डॉ.तुषार शेवाळे,सभापती माणिकराव बोरस्ते,उपसभापती राघोनाना आहिरे,चिटणीस डॉ.सुनील ढिकले व मविप्रचे सर्व पदाधिकारी , अधिष्ठाता डॉ- मृणाल पाटील,शिक्षणाधिकारी डॉ.आर-डी – दरेकर , वैद्यकीय अधीक्षक अजित पाटील यांनी अभिनंदन केले-
काय आहे  संशोधन ?
व्हिडीओ गेम सारख्या तंत्रज्ञानात रंगसंगती व टास्कमध्ये काही बदल केले तर त्यातून तुमची एकाग्रता आणि स्मरणशक्ती  वाढू शकते , पुलकित सिंग ने या संशोधनाकरिता व्हिडिओ गेम एडिट करणाऱ्या सॉफ्टवेअर चा वापर केला-  या प्रकल्पात  गेम खेळण्यापूर्वी व्यक्तीची असलेली  एकाग्रता   पाच स्टेप मध्ये दिलेल्या प्रशिक्षणानंतर अमुलाग्र वाढते .  या संशोधनाचा फायदा विद्यार्थी ,  ऑलम्पिक,  एथिलीते नेमबाज  याना अधिक होईल दावा या संशोधक विद्यार्थी आणि त्यांच्या मार्गदर्शकांनी  केला आहे.
फोटो :- गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठात झालेल्या आंतरविद्यापीठ राज्यस्तरीय अविष्कार संशोधन महोस्तवात राज्यात दुसरा आलेला डॉ- वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाचा संशोधक विध्यार्थी पुलकित सिंग समवेत अधिष्ठाता डॉ- मृणाल पाटील , मार्गदर्शक डॉ- प्रदीप बर्डे , डॉ- नीता गांगुर्डे , डॉ- सतीश वाघमारे, मुस्कान गाबा  .

Recent News