बहुजन हिताय बहुजन सुखाय

मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक.

Maratha Vidya Prasarak Samaj, Nashik.

Central Office, Shivaji Nagar, Gangapur Road, Nashik-422002, Maharashtra, India.

National Sports Day

National sports Day

डॉ- पवार वैद्यकीय महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा

कुठलाही खेळ खेळतांना हारजीत आणि विविध स्तरावर प्रतिनिधित्व याहीपेक्षा निर्माण झालेली लढाऊ वृत्ती जीवनातील संकटांना धैर्याने सामोरे जाण्याची ताकद देते, खेळाडूंचा झालेला विकास केवळ हा त्याच्या परिवाराचा नव्हे तर समाज आणि देशाचं नाव उज्ज्वल करीत असतो , असे प्रतिपादन नाशिकचे ग्रामीण पोलीस अधिक्षक संजय दराडे यांनी व्यक्त केले

मराठा विद्या प्रसारक समाजाच्या डॉ- वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या वतीने राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त जिल्हास्तरीय रक्तदान शिबीर घेण्यात आले- त्याप्रसंगी संजय दराडे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते- व्यासपीठावर अधिष्ठाता डॉ- मृणाल पाटील , शिक्षणाधिकारी डॉ – आर. डी . दरेकर, क्रीडाधिकारी प्रा- हेंमंत पाटील , वैद्यकीय अधीक्षक डॉ- अजित पाटील आदी मान्यवर उपस्थित होते- कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्व्लनाने झाली- हॉकी चे जादूगार भारताचे महान खेळाडू मेजर ध्यानचंद आणि स्वर्गीय डॉ- वसंतराव पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले- अधिष्ठाता डॉ- मृणाल पाटील यांनी प्रास्ताविक करतांना क्रीडा आणि आरोग्य यांचं जवळच नातं विशद केले- क्रीडा क्षेत्रात मविप्रच्या योगदानाचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला- डॉ – आर. डी . दरेकर, प्रा. हेमंत पाटील, यांनीही मनोगत व्यक्त करीत क्रीडा दिन आणि मविप्रत क्रीडा विषयक सुरु असलेल्या उपक्रमाची माहिती दिली- यावेळी तलवार बाजी स्पर्धेत मविप्रच्या विद्यार्थिनींने मिळवलेल्या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांना यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात गौरविण्यात आले- नाशिक जिल्ह्यातील मविप्रच्या विविध महाविद्यालयातून आलेल्या खेळाडूंनी या शिबिरात उत्स्फुर्त सहभाग नोंदवित रक्तदान केले- राष्ट्रीय क्रीडा दिन रक्तदान करून साजरा करण्याचा आदर्श मविप्रच्या व्यासपीठाद्वारे उभा केला आहे- कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शारीरिक शिक्षण संचालक प्रा. दिलीप गायकवाड यांनी केले- पाहुण्यांचा परिचय डॉ- सुनील औंधकर यांनी करून दिला तर रक्तपेढीच्या प्रमुख डॉ- अनिता पाटील यांनी आभार मानले- याप्रसंगी प्रा- डॉ- प्रीती बजाज , डॉ- अनिता पाटील , डॉ- विजय गवळी आदींसह जिल्हाभरातील खेळाडू, वैद्यकीय महाविद्यालयाच्या विविध विभागांचे प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते- कार्यक्रम यशस्वीतेसाठी पॅथॉलॉजी व रक्तपेढी विभाग प्रयत्नशील होता- अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेतील पदक विजेता सागर गाढवे आणि क्रीडाधिकारी प्रा. हेमंत पाटील सर्वप्रथम रक्तदान करून शिबिराचा प्रारंभ केला- या रक्तदान शिबिरात नाशिक शहर व जिल्ह्यातील सुमारे ४०० खेळाडूंनी सहभाग नोंदविला .