मविप्र संस्थेच्या वतीने ‘ अभियंता दिन ‘ साजरा.. सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जन्मदिनानिमित्त ‘ अभियंता दिन ‘ साजरा केला जातो. या अभियंता दिनाचे औचित्य साधून मविप्र संस्थेच्या वतीने संस्थेच्या इंजिनीअर्स चा सन्मान करण्यात आला. यावेळी संस्थेचे सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे,उपाध्यक्ष विश्वास मोरे, सभापती श्री बाळासाहेब क्षीरसागर यांच्या हस्ते इंजि.सविता ठोंबरे, इंजि. शौनक तनपुरे,इंजि.रावसाहेब दाते, इंजि.राहुल जाधव व इंजि.जयेश डुकरे यांचा पुस्तक व शाल देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षणाधिकारी डॉ डी. डी. लोखंडे,डॉ अजित मोरे,प्रा दौलत जाधव उपस्थित होते.
