मराठा विद्या प्रसारक समाजाच्या आयएमआरटी (इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च अँड टेक्नॉलॉजी) महाविद्यालयाच्या ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागामार्फत एमबीएच्या तब्बल ४८ विद्यार्थ्यांना नोकरी मिळून प्लेसमेंट्स झाल्याबद्दल सत्कार समारंभ पार पडला. या समारंभात विविध विभागांतील विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळाल्याबद्दल संस्थेच्या वतीने सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी मविप्र समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, सभापती व महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वास मोरे, उपसभापती देवराम मोगल, नाशिक शहर संचालक ॲड. लक्ष्मण लांडगे, नाशिक ग्रामीण संचालक रमेश पिंगळे, शिक्षणाधिकारी डॉ. अजित मोरे आदी उपस्थित होते.
या वर्षीच्या प्लेसमेंटमध्ये एकूण १७ कंपन्यांनी एमबीए विद्यार्थ्यांची मुलाखत घेतली. यामध्ये २३ विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांमध्ये नोकरीची संधी मिळाली. तसेच, एमबीए आयटी विभागासाठी १२ कंपन्यांनी मुलाखत घेतली. ज्यामध्ये ९ विद्यार्थ्यांना सर्वात चांगल्या आयटी कंपन्यांमध्ये नोकरीची संधी मिळाली. एमबीएच्या एचआरडी (ह्यूमन रिसोर्स डेव्हलपमेंट) विभागात एकूण १९ कंपन्यांनी मुलाखत घेतली आणि यात १६ विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली.