Maratha Vidya Prasarak Samaj

कर्मवीर काकासाहेब वाघ कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील प्रा.नारायण शिंदे व प्रा.योगिता शेळके यांना विद्यावाचस्पती पदवी प्राप्त

उत्तम अध्यापक होण्यासाठी नियमित वाचन, सखोल चिंतन आणि

संशोधन वृत्ती ही शिक्षकांसह प्राध्यापकांत असणे गरजेचे आहे. हे गुण असणारे प्राध्यापक

विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी प्रेरणास्थानी असतात. प्राप्त ज्ञानावरती न थांबता

प्राध्यापकाने सातत्याने स्वतःला अद्ययावत करावे. इंटरनेटमुळे माहितीचा स्फोट झाला आहे.

एका क्लिकवर माहिती येऊन ठेपली आहे. यातून उत्तम ज्ञान, माहितीची निवड करून ती

विद्यार्थ्यापर्यंत सुलभतेने पोहचवली पाहिजे, असे प्रतिपादन मराठा विद्या प्रसारक

समाज संस्थेचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे यांनी व्यक्त केले.

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या पिंपळगाव बसवंत येथील कर्मवीर काकासाहेब

वाघ कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील प्रा. नारायण शिंदे आणि

प्रा. योगिता शेळके यांना अनुक्रमे इतिहास आणि रसायनशास्त्र या विषयात सावित्रीबाई फुले

पुणे विद्यापीठाकडून विद्यावाचस्पती ही पदवी प्राप्त झाली. या यशाबद्दल त्यांचा सत्कार करताना

त्यांनी आपले मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले. यावेळी मविप्र शिक्षणाधिकारी प्रा. डॉ. नितीन जाधव,

शिक्षणाधिकारी प्रा. डॉ. भास्कर ढोके, महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. ज्ञानोबा ढगे व प्रा. दत्तात्रय शेळके

आदी उपस्थित होते. प्रा. नारायण शिंदे यांनी ‘खान्देशातील खादी चळवळीचा ऐतिहासिक अभ्यास (इ.स.

१९०० ते २०००)’ या विषयाचा अभ्यास करून आपले संशोधन कार्य पूर्ण केले. त्यांना प्रा. डॉ. लहू गायकवाड यांचे

मार्गदर्शन लाभले. प्रा. योगिता शेळके यांनी रसायनशास्त्र विषयात ‘सिंथेसीस ऑफ अॅडव्हान्सड् कॉम्पोझीट

अॅण्ड कोअर शेल नॅनोपार्टिकल्स् : देअर अॅप्लिकेशन अॅज कॅटालिस्ट अॅण्ड गॅस सेन्सर’ या विषयाचा अभ्यास करून

आपले संशोधन कार्य पूर्ण केले. त्यांना प्रा. डॉ. बोऱ्हाडे, अशोक विश्राम आणि प्रा. डॉ. बोबडे विवेक यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Comment