गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्याल सिन्नर येथे कार्यरत असलेल्या रसायनशास्त्र विभागातील प्रा. अंकिता रायते यांना भारत आणि थायलंड दरम्यान स्टुडंट रिसर्च एक्स्चेंज प्रोग्राम योजनेअंतर्गत इंडो-थियो सहयोगातून प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय स्तरावरील यंग सायंटिस्ट अवॉर्ड पुरस्कार जाहीर करण्यात झाला आहे. सदर पुरस्कार त्यांच्या ज्युरी टीमच्या सर्व सदस्यांकडून कठोर तपासणी आणि शिफारसीनंतर अंतिम करण्यात येतो. हा पुरस्कार शिनावात्रा विद्यापीठ, थायलंड द्वारे जगभरातील उच्चस्तरीय संशोधनात योगदान देणाऱ्या संशोधन विद्वानांना दिला जातो. प्रकाशक, समीक्षक म्हणून त्यांचे संशोधन कार्याचे वर्षभर प्रयत्न करणाऱ्या गुणवंतांना सन्मानित करणे हा या पुरस्काराचा उद्देश आहे. हा पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांची शिनावात्रा विद्यापीठ आणि थायलंड सरकारच्या शिष्यवृत्तीसह सहयोगी संशोधन विद्वान म्हणून निवड करण्यात येईल. त्यांच्या या कौतुकास्पद गोष्टीसाठी मराठा विद्या प्रसारक समाजाचे सरचिटणीस या यशाबद्दल संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे ,अध्यक्ष डॉ सुनील ढिकले,सभापती बाळासाहेब क्षीरसागर,उपाध्यक्ष विश्वास मोरे,चिटणीस दिलीप दळवी,उपसभापती देवराम मोगल, संचालक मंडळ, शिक्षणाधिकारी डॉ.डी.डी लोखंडे, शिक्षणाधिकारी डॉ. एन.के.जाधव ,शिक्षणाधिकारी डॉ.विलास देशमुख प्राचार्य पी. व्ही. रसाळ, उपप्राचार्य प्रा. आर. व्ही. पवार, प्रा. एस. टी. पेखळे, रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा. मनोज गवारे, डॉ.सुभाष आहेरे आणि मुकुंद रायते यांनी अभिनंदन केले.