Maratha Vidya Prasarak Samaj

KTHM College

चेन्नई च्या हेल्प द ब्लाइंड फाउंडेशनकडून केटीएचएमच्या ३० अंध विद्यार्थ्यांना प्रत्येकी १० हजार रुपये शिष्यवृत्ती प्रदान

चेन्नई च्या हेल्प द ब्लाइंड फाउंडेशन नाशिक शाखेच्या वतीने केटीएचएमच्या ३० अंध विद्यार्थ्यांना प्रत्येकी १० हजार रुपये शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मविप्र सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे होते. यावेळी बोलतांना ॲड.ठाकरे यांनी ‘ अंध विद्यार्थ्यांची इच्छाशक्ती प्रशंसनीय आहे, त्यांच्या जिद्दीला सलाम आहे असे सांगत भविष्यात अंध विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी संस्था कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ आर डी दरेकर यांनी केले. त्यांनी महाविद्यालयात असलेल्या अंध विद्यार्थ्यांसाठी सोयी सुविधा यांची माहिती दिली. नाशिक शाखेचे श्री दत्ता कडवे यांनी त्यांच्या संस्थेची माहिती करून दिली. कार्यक्रमासाठी मविप्र संस्थेचे संचालक अमित बोरसे, श्री विठ्ठल सावकार, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ तुषार पाटील,प्रा अमोल गायकवाड, डॉ संतोष शेलार,शरद पिंगळे,श्री मवाळ,श्रीमती लव्हाटे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन डॉ तुषार पाटील यांनी तर आभार डॉ एन डी गायकवाड यांनी मानले.

#Nashik#Nasik#Nashikcity
#Nashikgram#Nitinthakare#Nitinthakare2024
#Nashikkar#mvp#mvpnashik

Leave a Comment