मराठा विद्या प्रसारक समाजाच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय आणि संशोधन केंद्र येथे पर्यावरण पूरक शाडू माती गणपती मूर्ती बनविण्याची करण्याची कार्यशाळा संपन्न झाली. मराठा विद्या प्रसारक समाजाचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, शिक्षणाधिकारी डॉ. ज्ञानेश्वर लोखंडे व अधिष्ठाता डॉ. सुधीर भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांसाठी एकदिवसीय शाडू माती गणपती मूर्ती बनवण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत 100 हुन अधिक पर्यावरण पूरक अशा गणपती मूर्ती साकारण्यात आल्या. यावेळी कान नाक घसा विभागाच्या प्रमुख आणि IQAC डायरेक्टर डॉ. श्रीया कुलकर्णी यांनी सुरवातीला पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन देऊन ह्या कार्यशाळेचे महत्त्व सांगितले. त्यांनी ८ स्टेप्स मध्ये गणपती मूर्ती बनवण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या प्रात्यक्षिका चा लाईव्ह डिस्प्ले स्क्रीन वर करण्यात आला, त्यामुळे सर्वांना मूर्ती बनवण्याचे बारकावे लक्षात आले. स्त्रीरोग व प्रसुती शास्त्र विभागाच्या प्राध्यापिका डॉ. पद्मजा जोशी, सहयोगी प्राध्यपिका डॉ.पुनम पाटील, दंत विभागाच्या सहाय्यक प्राध्यापिका डॉ.रचना चिंधडे यांनी देखील कार्यशाळेत मार्गदर्शन केले. यावेळी गणेश मूर्ती बनविण्याचे व रंगविण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. अधिष्ठाता डॉ. सुधीर भामरे यांनी कार्यशाळेला भेट देत सर्व सहभागी डॉक्टर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांचे कौतुक करत शाडू मातीतून गणपती मुर्ती साकारणे हा अभिनव उपक्रम पर्यावरण पूरक व अनुकरणीय असा आहे, असे प्रतिपादन यावेळी त्यांनी व्यक्त केले.कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.