दाभाडी ता.मालेगाव, येथे महिला मेळावा , प्रमाणपत्र वितरण व यशस्वी लाभार्थी सत्कार सोहळा
छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती नवी दिल्ली शाखा महाराष्ट्र व मराठा विद्या प्रसारक संचलित कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली जन शिक्षण संस्थान नाशिक यांच्या संयुक्त विदयमाने दाभाडी येथे महिलांसाठी ब्युटीशियन आणि फूड प्रोसेसिंग प्रशिक्षण देण्यात आले. त्याचे प्रमाणपत्र वितरण आणि महिला मेळावा आयोजित करण्यात आला.
सदर कार्यक्रमाप्रसंगी ,माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील हे म्हणाले ‘महिलांना स्वयंरोजगार प्रशिक्षण देऊन त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करून कुटुंबाला आर्थिक हातभार लावला आहे ,प्रशिक्षण देऊन महिलांना जास्त प्रमाणात वाव देण्याचे काम जन शिक्षण संस्थान नासिक करत आहे तसेच तयार केलेल्या वस्तूंचे मार्केटिंग महत्त्वाचे आहे,
ॲड. नितीन ठाकरे सरचिटणीस मविप्र यांनी कार्यक्रमाप्रसंगी बोलताना महिला सक्षमीकरणाचे काम संस्थेच्या माध्यमातून होत आहे कौटुंबिक गरज भागविणे त्यासाठी प्रशिक्षणाची गरज आहे महिलांना मुख्य प्रवाहात व प्रशिक्षण देण्याचे काम विविध प्रकारच्या कोर्सेसच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात होत आहे
प्रास्ताविकात सौ ज्योती लांडगे संचालक जन शिक्षण संस्थान नाशिक ह्या म्हणाल्या की महिलांनी आपला वेळ वाया न घालवता विविध व्यवसायाभिमुख कोर्सेस चे प्रशिक्षण घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करावा महिलांनी आता उद्योजक होवून आर्थकदृष्टया स्वावलंबी होणे गरजेचे आहे
सदर कार्यक्रमांमध्ये ब्युटीशियन व बेकिंग कुकिंग फूड प्रोसेसिंग कोर्स केलेला यशस्वी प्रशिक्षणार्थींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण करण्यात आले व यशस्वी लाभार्थी महिलांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले,
सदर कार्यक्रमास उपस्थित माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील, ॲड. नितीन ठाकरे सरचिटणीस मविप्र समाज ,शालन सोनवणे संचालक मविप्र ,श्री अरुण देवरे माजी संचालक श्री प्रमोद निकम सरपंच, ग्रामपंचायत दाभाडी, श्री अभिजीत निकम उपसरपंच प्राचार्य किशोर भामरे सर आयटीआय सटाणा, प्राचार्य बच्छाव सर आयटीआय मालेगाव, शिल्पा देशमुख जिल्हाध्यक्ष, जिजाऊ ब्रिगेड, अखिल भारतीय मराठा महासंघाचे सर्व पदाधिकारी व सदस्य, ग्रामपंचायत दाभाडी येथील सर्व ग्रामपंचायत सदस्य, उपस्थित होते,
सूत्रसंचालन अमोल निकम यांनी केले, आभार प्रा. पाटील सर यांनी केले,
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जन शिक्षण संस्थांचे कार्यक्रमाधिकारी संदीप शिंदे, दत्तात्रेय भोकनळ मार्गदर्शक शिक्षिका कविता देवरे मोहिनी निकम , सविता निकम उपस्थित सर्व महिलांनी परिश्रम घेतले.