सोमवार, दि. २० मे २०२४ ! जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीसाठी मतदानाचा पवित्र दिवस ! मतदानाच्या जनजागृतीसाठी मविप्र’च्या प्रत्येक शाळा-महाविद्यालयाने अभिनव मोहीमा यंदा राबविल्या होत्या. मतदान करणे हे प्रत्येक भारतीयाचे पवित्र कर्तव्य आहे. चला आपण मतदान करू व आपल्या शेजाऱ्यांना, नातेवाईक-मित्रांनाही मतदानासाठी उद्युक्त करू ! जय हिंद ! जय महाराष्ट्र !
