Maratha Vidya Prasarak Samaj

Address: Central Office, Shivaji Nagar, Gangapur Road, Nashik-422002, Maharashtra, India
11

नविन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी येत्या जूनपासून – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील..

नविन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी येत्या जूनपासून – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील.. आनंदशाळा हि नवीन नवीन शैक्षणिक धोरणावरील कार्यशाळा उत्साहात संपन्न ..

विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच व्यवसायाभिमुख शिक्षण देऊन जगाची दिशा समजून घेऊन देशात नवीन अभ्यासक्रमांची सुरुवात करावी लागेल. यामध्ये विद्यार्थ्यांना अधिकाधिक प्रात्यक्षिक ज्ञान मिळणार आहे. या आधारावर त्यांना व्यवसाय अथवा नोकरी मिळेल त्यामुळे नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी महाराष्ट्रातील सर्वच शैक्षणिक संस्थांनी येत्या जूनपासून करावी असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले ते मराठा विद्या प्रसारक समाज संस्‍था आणि भारतीय शिक्षण मंडळ, पश्‍चिम महाराष्ट्र प्रांत यांच्‍यातर्फे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० आनंदशाळा या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी गंगापूर रोडवरील मविप्र संस्‍थेच्‍या कर्मवीर ॲड.बाबूराव गणपतराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालय येथे बोलत होते. अध्यक्षस्थानी मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲड नितीन ठाकरे होते. व्यासपीठावर राजेश पांडे , सुकाणू समिती सदस्य डॉ महेश दाबक,माजी कुलगुरू डॉ सुहास पेडणेकर,डॉ शैलेंद्र देवळणकर,राजाराम पानगव्हाणे, अपूर्व हिरे, अजिंक्य वाघ, विजय नवल पाटील,सागर वैद्य, रविंद्र सपकाळ,डॉ ए बी मराठे, हेमंत धात्रक, मविप्र संस्थेचे अध्यक्ष डॉ सुनील ढिकले, सभापती बाळासाहेब क्षीरसागर,उपाध्यक्ष विश्वास मोरे, चिटणीस दिलीप दळवी, संचालक ॲड संदीप गुळवे,नंदकुमार बनकर, रमेश पिंगळे,विजय पगार,अमित बोरसे, मा.आ.नानासाहेब बोरस्ते,मुरलीधर पाटील,प्रो माधव वेलिंग, डॉ जोगेंद्रसिंग बिसेन ई उपस्थित होते. पुढे बोलतांना चंद्रकांत पाटील यांनी ‘ नवीन शैक्षणिक धोरणाची अभ्यासपूर्ण मांडणी करताना विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक व अनुभवाधारित ज्ञान मिळण्यासाठी महाराष्ट्र शासनाने शासकीय कार्यालय, ग्रामपंचायत,तलाठी ऑफिस,पंचायत समिती येथे इंटर्नशिप करता यावी म्हणून शासन आदेश पारित केला आहे. जर्मनीमध्ये दरवर्षी ४ लाख भारतीयांना नोकरी उपलब्ध होणार आहे त्यामुळे भारतीय युवकांना नोकरीच्या दृष्टीने मोठी मागणी असणार आहे. मात्र त्यासाठी तेथील भाषा व कौशल्ये आवश्यक आहेत. तसेच मुलींना येत्या १ जूनपासून सर्व शिक्षणाचा लाभ मोफत मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. स्वागत व मनोगतात मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲड नितीन ठाकरे यांनी ‘ बहुजन समाजाच्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे या उद्देशाने कर्मवीरांनी मविप्र संस्थेची स्थापना १०९ वर्षांपूर्वी केली. संस्थेमध्ये आता उच्च , तंत्र शिक्षणाचीही व्यवस्था विद्यार्थ्यांसाठी केली आहे. नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणे संस्था हि सर्व अभ्यासक्रमांच्यानुसार कृतीशील पावले टाकत आहे. प्रास्ताविकात सुकाणू समिती सदस्य डॉ महेश दाबक यांनी ‘ नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र हे देशात नंबर एक वर असून महाराष्ट्रातील सर्व शैक्षणिक संस्थांनी याची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे सांगून त्यांनी न.शै.धोरणाचा आढावा घेतला. डॉ मंदार भानुसे यांनी ‘ भारतीय ज्ञानपरंपरा ‘ या विषयावर बोलतांना ‘ ब्रिटिशांनी भारतीय ज्ञानपरंपरा खंडित केली आणि इंग्रजी माध्यमाची शिक्षण व्यवस्था आपल्यावर लादली. भारतीयांमध्ये स्वताबद्दल न्यूनगंड निर्माण केला. मुलांना प्राथमिक शिक्षण देतांना किमान आपल्या मातुभाषेत दिले पाहिजे. जापान,जर्मनी,फ्रांस आणि इस्रायल हे देश त्यांच्या मातृभाषेत शिक्षण देत असूनहि जगात अग्रेसर आहेत. विविध विषयांना भारतीय ज्ञानपरंपरेत आणले पाहिजे. यामध्ये विद्यार्थ्यांना स्वावलंबन,ज्ञान,चारित्र्य,आचरण याची माहिती दिल्यास त्यांच्यात चांगले संस्कार निर्माण होतील. दुसऱ्या सत्रात मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू सुहास पेडणेकर यांनी ‘ राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणीत प्राचार्यांची भूमिका आणि अपेक्षा , अंमलबजावणीतील आव्हाने, ए बी सी आणि बहुविद्याशाखीय दृष्टीकोन, ऑनलाईन टिचिंग याबाबत मार्गदर्शन केले. तिसऱ्या सत्रात ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर्स ऑन जॉब ट्रेनिंग व स्कूल कनेक्ट याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. चौथ्या सत्रात पुणे विद्यापीठाचे डॉ संजय ढोले यांनी आय क्यू ए सी आणि ए आर सी रिसर्च अँड इनोव्हेशन याबाबत मार्गदर्शन केले. पाचव्या सत्रात अमरावती येतील प्रा ए बी मराठे यांनी ‘ नॅशनल क्वालिटी फ्रेमवर्क आणि लर्निंग आउटकम बेस्ड करीक्युलम फ्रेमवर्क ‘ या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यशाळेचा समारोप महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण मुख्य सचिव विकास रस्तोगी आणि उच्चशिक्षण संचालक शैलैन्द्र देवळाणकर यांच्या ऑनलाइन उपस्थितीत करण्यात आला. यावेळी दिवसभरात झालेल्या विविध ५ सत्रातील चर्चासत्रांचा लेखाजोखा सादर करण्यात आला. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी संस्थेचे शिक्षणाधिकारी डॉ नितीन जाधव ,डॉ भास्कर ढोके, डॉ डी डी लोखंडे,कर्मवीर ॲड.बाबूराव गणपतराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

https://www.facebook.com/reel/309194101803905

Leave a Comment