मराठा विद्या प्रसारक समाज संचलित होरायझन अकॅडमी ICSE मध्ये पहिल्या ‘रोबोटिक लॅब’ ची सुरुवात करण्यात आली. रोबोटिक लॅब चे उद्घाटन सरचिटणीस ॲड. डॉ.नितीन बाबुराव ठाकरे यांनी केले. या प्रसंगी मविप्रचे इगतपुरीचे संचालक श्री. संदीप गुळवे, नाशिक शहराचे संचालक अॅड. लक्ष्मण लांडगे, सेवक संचालक श्री. चंद्रजित शिंदे आणि शिक्षणाधिकारी श्री. बी.डी.पाटील, शाळा व कनिष्ठ महाविद्यालय व्यवस्थापन समिती सदस्य, पालक शिक्षक संघाच्या सदस्यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
ICSE प्राचार्या डॉ. निधी मिश्रा यांच्यासह होरायझन स्कूल्स शाखेच्या प्राचार्या श्रीमती श्रुती देशमुख, श्रीमती दिप्ती पटेल आणि श्रीमती नेहा सोनवणे यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
रेबॉट ऑटोमेशन प्रा.लि.कंपनीची स्थापना MVP चे अभियांत्रिकी शाखेचे विद्यार्थी श्री. सागर पाटील, रेबॉटचे संस्थापक आणि मिस. दामिनी जाधव आणि सह-संस्थापक श्री. रुषिकेश गायकवाड यांनी केली आहे. रेबॉट ऑटोमेशन ही केवळ एक कंपनी नसून एक सर्जनशील संकल्पना आहे. या तंत्रज्ञानाचा अवलंब प्राथमिक स्वरुपात शालेय अभ्यासक्रमात एकत्रित केला जातो. रोबोटिक लॅब चे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना विकसित होत असलेल्या रोबोटिक्स आणि ड्रोन तंत्रज्ञानाचे शिक्षण देणे हे आहे.
आमच्या विद्यार्थ्यांना व्यावहारिक, वास्तविक जगाच्या परिस्थितींमध्ये सामावून घेण्यास प्रोत्साहित करून, रोबोट आणि ड्रोनची रचना करण्याची संधी मिळेल.
इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना यावेळी रोबोटिक्स लॅबची माहिती देण्यात आली.रेबोट टीमच्या सदस्यांनी वर्गांना भेट देऊन ड्रोनच्या कार्याचे प्रात्यक्षिक दाखवले.
प्रमुख पाहुणे ॲड. डॉ.नितीन ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यासाठी प्रेरणादायी विचार मांडले. श्रीमती नताशा वाघ यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.