मराठा विद्या प्रसारक समाज संचलित कृषी तंत्रनिकेतन नाशिकच्या विद्यार्थ्यांसाठी सह्याद्री फार्म्स प्रोड्युसर कंपनी मोहाडी येथे शैक्षणिक भेटीचे आयोजन करण्यात आले होते. शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी कृषि प्रक्रिया उद्योगामधले धाडसी वाटचालीचे प्रत्यक्ष दर्शन तेथे जाऊन सर्व विद्यार्थ्यांना घडले. श्री.विलास शिंदे व सहकारी शेतकऱ्यांना शेतमाल काढणीनंतरच्या प्रक्रियेसाठी त्या मालाचा प्रवास, प्रगतीमधील अडथळे, अपयश, आर्थिक विवंचना सतत भेडसावत असूनही ध्येय गाठण्याची जिद्द, चिकाटी, प्रत्यक्ष जागेवर जाऊन अभ्यासाची आत्मीयता, फळे, भाजीपाला परदेशी बाजारपेठ व प्रक्रिया उद्योगांचा परदेशातील विकास सह्याद्री टीमने प्रत्यक्ष भेट देऊन अभ्यासला. सुरुवातीला सह्याद्री फार्मच्या संशोधन व विकास विभागाच्या जनसंपर्क अधिकारी कु.पूजा कदम व प्रेरणा मॅडम यांनी सेमिनार हॉलमध्ये शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून सह्याद्री फार्मची वाटचाल आणि मानांकने दाखवली. सह्याद्री फार्ममध्ये प्रक्रिया उद्योगासाठी लागणाऱ्या कच्या मालाची प्रत्यक्ष प्रतवारी करणे, प्रक्रियेसाठी पूर्व तयारी, सुधारित यंत्रसामग्री, प्रक्रियेदरम्यान स्वच्छता व काळजी, प्रक्रियेचे ग्राहकाच्या मागणीनुसार पदार्थ व दर्जेदार पॅकिंग हे सगळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात बघायला मिळाले. तसेच शेतकरी देखील संघटित होऊन सामुदायिक परिसर विकास घडवू शकतो ह्याची प्रचीती विद्यार्थांना घडली.टाटा समूहाच्या मदतीने तरुणांना, महिलांना, विद्यार्थ्यांना अल्पमुदत शेतमाल प्रक्रिया प्रशिक्षण मार्गदर्शन वर्ग, त्यांचे मुक्काम, जेवण इ.सोयी परिसरात रोजगाराचे साधन घडवायला बहुमोल ठरणार आहे. सदर भेटीच्या उत्तरार्धात प्राचार्या सौ.ए.एस.पटवर्धन यांनी सह्याद्री फार्मच्या टीमचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभल्याबद्दल कंपनीचे आभार मानले.
#Nashik#Nasik#Nashikcity
#Nashikgram#Nitinthakare#Nitinthakare2024
#Nashikkar#mvp#mvpnashik