मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या नाशिक येथील मराठा हायस्कूलची विद्यार्थिनी श्रुती साहेबराव कहांडळची अखिल भारतीय विज्ञान मेळाव्यात राज्यस्तरावर निवड झाली. याप्रसंगी तिचा विद्यालयातर्फे सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कल्पना वारुंगसे होत्या व्यासपीठावर पर्यवेक्षक शिवाजी शिंदे व रंजना घंगाळे उपस्थित होते. अखिल भारतीय विज्ञान मेळाव्यात मराठा हायस्कूल ने प्रथम क्रमांक प्राप्त केला व मराठा हायस्कूलची विद्यार्थिनी श्रुती साहेबराव कहांडळ या विद्यार्थिनीने भरडधान्य एक उत्कृष्ट पौष्टिक अन्न की आहार भ्रम या विषयावर आपले मनोगत तसेच पी.पी.टी प्रेझेंटेशन,लेखी आशय क्षमता चाचणी या सर्व निकषांवर आधारित विज्ञान मेळावा विभाग स्तरावर प्रथम क्रमांक मिळवला व राज्यस्तरावर तिची निवड करण्यात आली सदर विद्यार्थिनीला दिपाली चौधरी,कविता घोटेकर व सर्व विज्ञान शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
तिच्या या यशाबद्दल मविप्र समाज संस्थेचे अध्यक्ष डाॅ.सुनील ढिकले,उपाध्यक्ष विश्वासराव मोरे, सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे ,चिटणीस दिलीप दळवी,सभापती बाळासाहेब क्षिरसागर,उपसभापती देवराम मोगल,नाशिक शहर संचालक ॲड. लक्ष्मण लांडगे,नाशिक ग्रामीण संचालक रमेश (आबा) पिंगळे,चांदवड तालुका संचालक डाॅ.सयाजीराव गायकवाड व सर्व संचालक मंडळ,मविप्र समाज संस्थेचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रा.डाॅ.भास्कर ढोके,शिक्षणाधिकारी प्रा.डाॅ.अशोक पिंगळे,प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डी.डी.जाधव, शालेय समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य,पालक – शिक्षक संघाचे अध्यक्ष व सर्व सदस्य, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कल्पना वारुंगसे,पर्यवेक्षक शिवाजी शिंदे, रंजना घंगाळे,सर्व शिक्षक वृंद,शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.