मविप्र संस्थेच्या मराठा हायस्कूल शाळेची माजी विद्यार्थिनी श्रेया दिलीप ठाकरे हिने वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी इंडियन नेव्ही मध्ये जाण्याचे स्वप्न पूर्ण केले. लहानपणापासून भारतीय सैन्यात जाण्याचे स्वप्न श्रेयाने बाळगले होते. ओरीसा राज्यातील आय एन एस चिल्का येथे श्रेयाने फिजिकल ट्रेनिंग पूर्ण करून केरळ राज्यातील कोची येथे प्रोफेशनल ट्रेनिंग पूर्ण केले. कोची ट्रेनिंग मध्ये AO, AR, AL, AE या चार ब्रांचमध्ये महाराष्ट्रातून प्रथम येण्याचा मान मिळविला. याबद्दल तिला ढाल देऊन गौरविण्यात आले. ११ मार्च रोजी गोवा येथे एअर इंजिनिअर पदावर रुजू होऊन देश सेवेचे कार्य सुरु केले आहे. श्रेया च्या यशाबद्दल मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲड नितीन ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष डॉ सुनिल ढिकले,सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वास मोरे,चिटणीस दिलीप दळवी,उपसभापती देवराम मोगल, संचालक मंडळ, शिक्षणाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.
#Nashik#Nasik#Nashikcity
#Nashikgram#Nitinthakare#Nitinthakare2024
#Nashikkar#mvp#mvpnashik