मराठा विद्या प्रसारक समाज माजी विद्यार्थ्यांनी नुकत्याच स्थापन केलेल्या मविप्र माजी विद्यार्थी संघटनेने ‘जिजामाता नर्सिंग शिष्यवृत्ती’ जाहीर केली आहे. पहिल्या टप्प्यात १५ विद्यार्थ्यांना प्रत्येकी रु १०,००० देण्यात येणार आहेत. याच शिष्यवृत्तीचे प्रमाणपत्र वितरण सोहळा मराठा विद्या प्रसारक समाजाचे नर्सिंग विद्यालयात पार पडला.
यावेळी मविप्रचे सरचिटणीस अँड. नितीनजी ठाकरे सर, मविप्र माजी विद्यार्थी संघटनेचे संचालक विवेकजी भामरे, मविप्र उपाध्यक्ष विश्वासराव मोरे, वैद्यकीय महाविद्यालय स्थानिक व्यवस्थापन समितीचे डॉ रायते, शिक्षण अधिकारी डॉ ज्ञानेश्वरजी लोखंडे, मविप्र नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या पौर्णिमा नाईक व इतर मान्यवर उपस्थित होते.
जिजामाता नर्सिंग शिष्यवृत्ती मविप्र माजी विद्यार्थी संघटनेतर्फे देण्यात येत आहे. आर्थिक स्थिती, शैक्षणिक निकष व मुलाखत ह्या आधारावर ह्या मुला-मुलींची निवड करण्यात येते. नर्सिंग हा वैद्यकीय सेवांचा आत्मा आहे. येत्या काळात ह्या व्यवसायाला मागणी वाढत जाणार आहे. रोजगाराच्या संधी इतरत्र कमी होत असल्या तरी ह्या क्षेत्रात मात्र त्या वाढतच आहे. त्यामुळे अधिकाधिक गुणवत्ताधारक मुला-मुलींना नर्सिगकडे आकर्षित करणे हा जिजामाता शिष्यवृत्तीचा हेतू
आहे. पहिल्या टप्प्यात पंधरा विद्यार्थ्यांना रू. १०,००० प्रदान करण्यात येत आहेत. काहींना ही मदत वाढवून रू. २०,००० करण्यात येणार आहे.
माजी विद्यार्थी संघटनेच्या योजनांनविषयी माहिती देतांना संस्थेचे संचालक विवेकजी भामरे यांनी सांगितले कि, “सध्या बारावी सायन्समध्ये अभ्यास करणाऱ्या मुला-मुलींनाही पुढे नर्सिंगच्या अभ्यासासाठी ही शिष्यवृत्ती देण्यात येईल. पुढे इतरही अनेक विशिष्ट क्षेत्रात टप्प्याटप्प्याने गरजू विद्यार्थांना मदत करण्याचा संघटनेचा हेतू आहे. ह्यात क्रीडा क्षेत्रात विशेष प्रावीण्य दाखवणाऱ्या मुला-मुलींनाही मदत होईल. त्याच बरोबर जगभरातील माजी विद्यार्थ्याना एकत्र करून प्रोफेशनल चॅप्टर्स, मेंटॉरशिप प्रोग्राम सुरु करण्यात येणार आहे.” यावेळी त्यांनी जास्तीत जास्त माजी विद्यार्थ्यांनी MVPalumni.com या संकेत स्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे व या चळवळीला बळ देण्यासाठी हातभार लावण्यास सांगितले आहे.