मविप्र समाजाच्या ॲड.बाबुराव गणपतराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियंता दिन प्रमुख पाहुणे श्री. श्रीकांत अहिरराव (डायरेक्टर, ॲडॅक्झी प्रा. लिमिटेड, पुणे व सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी आपल्या प्रास्ताविकात बोलताना मेकॅनिकल विभागप्रमुख डॉ. ए. बी. काकडे यांनी ‘ अभियंता दिनाच्या उपस्थितांना शुभेच्छा देत अभियंता दिनाचे महत्त्व विशद केले. या अभियंता दिनानिमित्त महाविद्यालयाने रक्तदान शिबिर, त्याचप्रमाणे अंतिम वर्ष विद्यार्थ्यांसाठी प्रोजेक्ट सिलेक्शन व असेसमेंट तसेच डिझाईन थिंकींग या विषयावर कार्यशाळा आयोजित केली होती. कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित प्रमुख पाहुणे श्रीकांत अहिरराव यांचा सत्कार मविप्र सरचिटणीस ॲड नितीन ठाकरे यांच्या हस्ते पार पडला. तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य व्ही. एम्. बिरारी यांनी सरचिटणीस ॲड नितीन ठाकरे यांचा सत्कार केला. यानंतर महाविद्यालयात विशेष प्राविण्य प्राप्त झालेले विद्यार्थी कु. आदित्य शेलार (मेकॅनिकल) कु. पंकज सोनार (एम्. ई. मेकॅनिकल), कु. दिव्या पाटील (कम्प्युटर), कु. जुल्फिन शेख (आयटी), कु. रितिका चव्हाण (सिविल), कु. हिमांशू (एम्. ई. सिव्हिल), कु. प्राची जयस्वाल (इ एन टीसी), कु. अश्विनी देवकर (इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल) याचप्रमाणे इंडियन सिविल सर्व्हिसेस मध्ये निवड झालेले महाविद्यालयाचे विद्यार्थी कु. रितिक भडागे, (लेफ्टनंट, इंडियन आर्मी), कु. ऋषिकेश सावंत (लेफ्टनंट, इंडियन आर्मी) कु. सायली अहिरे (असिस्टंट इंजिनिअर, सिव्हिल डिपार्टमेंट गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र), कु. हर्षवर्धन पगार (लेफ्टनंट, इंडियन आर्मी), कु. शिवानी शिंदे (पीडब्ल्यूडी विभाग, गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र), कु. मनोज कनोजे (टाऊन प्लॅनिंग, सिविल डिपार्टमेंट), कु. चेतन देवरे (ज्युनियर इंजिनिअर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका), कु. जैसल चौरसिया (असिस्टंट इंजिनियर, गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र), तसेच कुमार साहिल पाटील, (एफ एम, इंडिया लिमिटेड) व कु. वैदेही कुटे यांचा कंपनीमध्ये उच्चतम पॅकेज मिळाल्याबद्दल प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे श्री. श्रीकांत अहिरराव यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना सध्या सरकारतर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध स्टार्टअप व विनवेशन संकल्पना विषयी माहिती देऊन त्यांनी सरकारच्या या योजनांचा आपल्या भविष्यातील करिअरसाठी उपयोग करून घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मविप्र सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे साहेब यांनी विद्यार्थ्यांना अभियंता दिनाच्या शुभेच्छा देऊन सर विश्वेश्वरय्या यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात नाशिक विभागात केल्याचे नमूद केले व ही नाशिककरांसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे असे आवर्जून सांगितले. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना सर विश्वेश्वरायांच्या कार्याचा आढावा घेत त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून उत्तम अभियंता म्हणून विद्यार्थ्यांनी देखील आपले करिअर घडावे घडवावे असे आवर्जून सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक तेजस्विनी देशमुख यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन डॉ. बी. एस. टर्ले यांनी केले. वंदे मातरम ने कार्यक्रमाची सांगता झाली.