म.वि.प्र समाजाच्या अभिनव बाल विकास मंदिर उत्तमनगर सिडको शाळेत मा. मुख्याध्यापिका सौ. ज्योती पवार यांच्या मार्गदर्शनातून शाडू माती पासून गणपती तयार करण्याची कार्यशाळा घेण्यात आली. कृष्णा जाधव यांनी विद्यार्थ्यांना शाडू माती पासून गणपती तयार करण्यास शिकवले व योग्य असे मार्गदर्शन केले. शाडू मातीचा वापर केल्याने पाण्याचे होणारे प्रदूषण व गणपतीच्या मूर्तीची होणारी विटंबना आपण टाळू शकतो. हा संदेश या कार्यशाळेतून विद्यार्थ्याना देण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने शाडू माती पासून सुंदर अशा गणपतीच्या मूर्ती व पोळ्याच्या निमित्ताने बैल तयार केले. सदर कार्यक्रमास शाळेतील विलास जाधव, नीलिमा बच्छाव, अर्चना आहेर, दिपाली बागुल, वैशाली घोटेकर व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.