मराठा विद्या प्रसारक समाजाच्या होरायझन अकॅडमी ICSE ने सोमवार, ११ सप्टेंबर २०२३ रोजी इयत्ता आठवी, नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिथी व्याख्यान आयोजित केले होते. “सशस्त्र दलातील करिअर मार्गदर्शन”हा व्याख्यानाचा विषय होता.याप्रसंगी प्रमुख व्याख्याते म्हणून भारतीय लष्कर, भारतीय वायुसेना आणि भारतीय नौदलाच्या क्षेत्रातील प्रख्यात तज्ञ होते. उर्जा अकादमीचे संस्थापक श्री अनिरुद्ध तेलंग , निवृत्त कॅप्टन श्री शशांक जोशी, अनुभवी सागरी अभियंता आणि वायुसेनेचे प्राध्यापक ग्रुप कॅप्टन श्री राव, यांच्यासोबत भारत न्यूज चॅनेल चे मुख्य संपादक श्री देवराज सोनी हे उपस्थित होते. वक्त्यांचे आपापल्या क्षेत्रातील त्यांचे अनुभव जाणून विद्यार्थी मंत्रमुग्ध आणि प्रेरित झाले. आव्हानात्मक आणि अफाट समाधान देणारे नौदल क्षेत्र असून, भारत सरकारच्या सुरक्षा मंत्रालयाअंतर्गत कार्यरत आहे. राष्ट्पती हे नौदलाचे प्रमुख असतात. तर नौदलातील ॲडमिरल हे सर्वोच्च पद आहे. समुद्रातील आव्हानात्मक वातावरणात साहस आणि कार्य करण्याची संधी नौदल देते. नौदलात नाविक आणि अधिकारी या दोन विभागात तुम्ही करियर करू शकता. उच्च तंत्रज्ञान असलेल्या संस्थेचा एक भाग होण्याची संधी या विभागातील विविध पदांद्वारे तुम्हाला प्राप्त होते. आपली शिक्षण आणि कौशल्य याद्वारे या विभागातील विविध पदांसाठी अर्ज करता येतो. लष्करातील करिअरच्या माध्यमातून देश सेवा करण्याची प्रचंड मोठी संधी आहे असे श्री राव यांनी सांगितले. लष्कराच्या तीनही दलात अधिकारी पदाबरोबरच इतरही अनेक संधी आहेत. आपल्या राज्यातून लष्करात भरती होण्याची परंपरा आहे. आपली लष्करी सेवेची परंपरा कायम राखण्यासाठी लष्करातील सेवेला प्रथम प्राधान्याचा विचार करायला हवा’, असे आवाहन शशांक जोशी यांनी केले. विद्यार्थ्यांसाठी हे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲड.डॉ.नितीन ठाकरे , शिक्षणाधिकारी प्रा बी.डी.पाटील, शाळेच्या प्राचार्य डॉ.निधी मिश्रा यांचे मनापासून आभार मानले.