कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (सीआयएससीई) अंतर्गत गोरेगाव, मुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या प्रादेशिक जलतरण स्पर्धेमध्ये पदकांची हॅट्ट्रीक घेत नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या मविप्रच्या होरायझन अकॅडमीतील (आयसीएसई) गौरी झोळेकर या विद्यार्थिनीची राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. याबद्दल मविप्र संस्थेचे पदाधिकारी व शाळेतर्फे तिचा सत्कार करण्यात आला.या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत एकूण २० शाळांनी सहभाग नोंदवला होता. यापैकी होरायझन अकॅडमीच्या गौरी झोळेकर हिने २०० मीटरमध्ये रजत, ४०० आणि ८०० मीटरमध्ये सुवर्ण अशा तीनही प्रकारांत तीन पदके पटकाविले.गौरी झोळेकर हिची बंगलोर येथे होणाऱ्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. तिला क्रिडाशिक्षक जगदीश गोल्डे, सचिन पगारे, दत्तात्रय पवार यांचे मार्गदर्शन लाभले.याप्रसंगी मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, आमदार हिरामण खोसकर, मविप्र शहर संचालक ॲड. लक्ष्मण लांडगे, प्रवीण जाधव, प्राचार्य डॉ. प्रशांत पाटील, जपानस्थित लोईलोचे अध्यक्ष रयुतरो सुगियामा, शिक्षणाधिकारी डॉ. कैलास शिंदे, मुख्याध्यापिका डॉ. निधी मिश्रा आणि संस्थेचे इतर पदाधिकारी यांच्या हस्ते शाळेमध्ये गौरीचा सत्कार करण्यात आला.