सीबीएसईने जाहीर केलेल्या दहावीच्या निकालात मविप्रच्या होरायझन अकॅडमीतील विद्यार्थ्यानी दैदीप्यमान यश प्राप्त केले. अनेक विद्यार्थ्यांनी तब्बल नव्वद टक्क्यांहून जास्त गुण मिळवून पहिल्या पाच मध्ये येण्याचा मान मिळविला आहे. यात खुशी पाटील हिने 97 टक्क्यांसह प्रथम क्रमांक तर अस्मिता जगझाप हिने 96 टक्क्यांसह द्वितीय क्रमांक पटकावला. तृतीय क्रमांक सिद्धेश घोटेकर व समर्थ मुळाणे यांना 94.40 टक्यांसह तर चौथा सिद्धेश मोरे 94% आणि पाचवा क्रमांक विभागून ओम लहामगे आणि जान्हवी पिंगळे 93.4% यांनी मिळवला.
हिंदी, मराठी सारख्या भाषा विषयांत देखील खुशी पटियाला, अस्मिता जगझाप, सारा डोंगरे यांनी पैकीच्या पैकी मार्क्स मिळविले तर समाजशास्त्रात सिद्धेश घोटेकर, समर्थ मुळाणे यांनी 100 मार्क्स संपादन केले.
दहावी उत्तीर्ण झालेल्या शाळेच्या या दुसर्या तुकडीच्या भरघोस यशस्वीतेबद्दल मविप्र संस्थेचे सरचिटणीस अॅड. नितिन ठाकरे यांच्यासह अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, उपाध्यक्ष विश्वास मोरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपसभापती देवराम मोगल, चिटणीस दिलीप दळवी आणि सर्व स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या यशासाठी वर्षभर संस्थेचे शिक्षणाधिकारी बी. डी. पाटील, प्राचार्या सृष्टी देशमुख आणि शिक्षक वृंदाने विशेष परिश्रम घेतले.