होरायझन अकॅडमी आयसीएसईच्या शिवम भुसारेची राष्ट्रीय रायफल आणि पिस्टल नेमबाजी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड
नाशिक- कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्सामिनेशन्स अंतर्गत बंगलोर येथे ऑगस्ट महिन्यात आयोजित राष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धेसाठी मविप्र संचालित होरायझन अकॅडमी आयसीएसई मधील विद्यार्थी शिवम भुसारे याची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.
जुलै महिन्यात कामगार क्रीडाभवन, मुंबई येथे पार पडलेल्या प्रादेशिक रायफल आणि पिस्टल नेमबाजी स्पर्धेत शिवम भुसाराने नेत्रदीपक कामगिरी बजावली. राज्यभरातील एकूण तीस शाळांनी या नेमबाजी स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला होता. यात शिवम भुसारे याने १७ वर्षे वयोगटात १० मीटर पिपसाईट रायफल प्रकारात रजत पदक पटकावले. शिवमला शाळेचे क्रीडा शिक्षक व नेमबाज सचिन पगारे यांचे मार्गदर्शन लाभले.
याप्रसंगी मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वास मोरे, उपसभापती डी. बी. मोगल, चिटणीस दिलीप दळवी, ॲड लक्ष्मण लांडगे, प्रवीण नाना जाधव, डॉ. संदीप पाटील, जपान स्थित लोईलोचे अध्यक्ष रयुतरो सुगियामा, शिक्षणाधिकारी डॉ. कैलास शिंदे , शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. निधी मिश्रा आणि संस्थेचे इतर पदाधिकारी यांनी शिवम यास पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत अभिनंदन केले