CISCE अंतर्गत प्रादेशिक रायफल आणि पिस्तोल नेमबाजी स्पर्धा २०२३-२०२४ ह्या दिनांक २४ ते २६ ऑगस्ट २०२३ रोजी स्वातंत्रवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, दादर (प), मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या होत्या. या स्पर्धेमध्ये होरायझन अकॅडेमी ICSE, नाशिक या शाळेतील विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी बजावली.या राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेत एकूण ३१ शाळांनी आपला सहभाग नोंदविला होता. सदर स्पर्धेत होरायझन अकॅडेमीच्या विद्यार्थ्यांनी रायफल शुटींग वयोगट १७ मध्ये सिद्धी भुसारे हिने सिल्वर, शिवम भुसारे सिल्वर, वयोगट १४ मध्ये अर्णव कापडणीस सिल्वर व वयोगट १७ पिस्तोल शुटींग मध्ये स्वामी आहेर याने सुवर्णपदक पटकावले.
चारही खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाकडून निवड झाली आहे.सदर राष्ट्रीय स्पर्धा हि बंगलोर येथे २८ ते ३० सप्टेंबर रोजी होणार आहे.वरील सर्व विद्यार्थ्यांची राष्ट्रीय पातळीवर निवड झाली. या विद्यार्थ्यांना शाळेचे क्रीडा शिक्षक सचिन पगारे यांचे मार्गदर्शन लाभले.स्पर्धेतील विजेत्यांचे मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे ,अध्यक्ष डॉ सुनिल ढिकले,सभापती बाळासाहेब क्षीरसागर,उपाध्यक्ष विश्वास मोरे,उपसभापती देवराम मोगल,चिटणीस दिलीप दळवी,संचालक अॅड.लक्ष्मण लांडगे,संचालक रमेश पिंगळे, शिक्षणाधिकारी बी.डी. पाटील , शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. निधी मिश्रा आणि संस्थेच्या इतर पदाधिकारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या